रायगड जिल्ह्यातील घटना!
जिवंत विद्युत तारा भाताच्या मळणीवर कोसळल्या,
विद्युत महामंडळाच्या आडमुठ्या धोरणाचा बळीराजाला फटका,
सुदैवाने जिवीतहानी नाही,कुटुंबावर उपासमारीची वेळ!
कोलाड:- (विश्वास निकम) रोहा तालुक्यातील खांब विभागातील मौजे चिल्हे येथे चालू विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत तारा तुटून एका शेतकऱ्यांनी आपल्या शेतात साठून ठेवलेल्या भातमळणीवर कोसळल्या तर जिवंत विद्युत पुरवठा करणाऱ्या या तारांच्या स्पार्क ठिणग्यांमुळे एका शेतकऱ्यांची साठवून ठेवलेली भाताची मळणी जळून खाक झाल्याची खळबळजनक घटना रविवारी २० एप्रिल रोजी दुपारी घडली असून त्यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील तसेच खांब विभागातील मौजे चिल्हे येथील युवा शेतकरी ज्ञानेश्वर महाडिक यांनी आपल्या शेतात खरीप हंगामातील दोन एकरात भाताचे पीक काढले त्याची मळणी आपल्या शेतात साठवून ठेवली होती त्याच मळणीवर जिवंत विद्युत तारा तुटून कोसळल्याने खाली असलेल्या भात माळणीला आग लागली आणि त्या आगीत दोनशेहून अधिक धनाच्या साठवलेल्या मोळ्या तर चाळीहून अधिक क्विंटल धान यात जळून खाक झाल्याने बळिराजा मोठा आर्थिक संकटात सापडला असून त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
अचानक विद्युत तारा तुटून कोसळल्या आणि त्यात शेतकऱ्याची धनाची मळणी जळून खाक झाल्याने सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली तर विद्युत महामंडळाच्या या गलथान कारभारविरोधात येथील ग्रामस्थानी कमालीचा संताप व्यक्त केला तर घडलेल्या घटनेची माहिती मिळताच कोलाड येथील कनिष्ठ अभियंता सोबनीस यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली तसेच शेतकऱ्याचे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले तर विद्युत तारा कोसळल्याने पुरवठा खंडित झाला होता त्यावर तत्काल तीन ते चार तासात विद्युत मंडळाच्या कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेत उपाय योजना करुन येथील ग्रामस्थांना विद्युत पुरवठा सुरू करून देण्यात यशस्वी झाले.
Comments
Post a Comment