भारत स्वतंत्र, स्वावलंबी, समृद्ध आणि विकसित खेड्यांचा आणि संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारा जगद्गुरुपदावर पुन्हा प्रतिष्ठापित होणारा असा देश उभा करू या! :-विनयजी कानडे 

  कल्याण येथे कै.रामभाऊ म्हाळगी  स्मृतिदिन मोठ्या उत्साहात संपन्न!

 स्मृतिदिनाच्या निमित्ताने संस्थेत उत्कृष्ट काम करणाऱ्या गुणीजणांना पुरस्कार देऊन केला गौरव!

  कल्याण( प्रतिनिधी) भारत हा स्वतंत्र खेड्यांचा स्वावलंबी समृद्ध खेड्यांचा आणि विकसनशील व जगाला मार्गदर्शन करणारा जगद्गुरु पदावर प्रतिष्ठापित होणारा असा भारत देश उभा करू या  असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  ग्रामविकास  पश्चिम क्षेत्राचे प्रमुख देविदासजी कानडे यांनी केले  ते छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण आयोजित कै.रामभाऊ म्हाळगी स्मृतिदिना निमित्ताने नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण  येथे आयोजित करण्यात आलेल्या  'ग्रामविकासातून राष्ट्रविकास,या विषयावर ते आयोजित व्याख्यान पर बोलत होते. ते पुढे म्हणाले की  विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीचे कार्य खूप मोठे आहे त्यांचे चिंतन करणे महत्त्वाचे आहे आजही भारतातील 65 टक्के जनता ही खेड्यात राहते भारताच्या विकासाचा केंद्रबिंदू ही खेडी आहेत भारतात इस्लामी राजवट येण्याचे आधी स्वतंत्र खेड्यांचा देश स्वतंत्र होता इस्लामी राजवटीमध्ये हा देश परतंत्र झाला खेडी स्वातंत्र होती खेड्यांच्या व्यवस्था जसेच्या तसे राहिल्या होत्या मात्र इंग्रज राजवटीमध्ये हा देश परतंत्र खेड्यांचा परतंत्र देश झाला. 1947 नंतर हा आपला देश स्वतंत्र देश स्वतंत्र झाल्यानंतर परतंत्र खेड्यांचा स्वातंत्र देश झाला आणि इंग्रजांनी ज्या पद्धती, जी कायदे  ज्या व्यवस्था होत्या चालू राहिल्या.  इंग्रजांनी भारताचे सर्व पद्धतीचा अभ्यास केला भारताला कायमचे गुलाम बनवायचे असेल तर प्रथम या ठिकाणची ग्रामीण व्यवस्था संपवली पाहिजे आणि म्हणून त्यांनी शिक्षण पद्धतीवर प्रथम घाव घातला मेकॉले नावाची शिक्षण पद्धती आणली. इंग्रजी शिक्षण आणून खेड्यातल्याभागातल्या शाळा बंद पडल्या. आणि भारतातील खेड्यांचे वाटोळे झाले भारत देश कृषी प्रधानच नाही तर कृषी आणि वाणिज्य प्रधान  देश होता  संपूर्ण जगाला जगवायचा आणि जगाचा अन्नदाता होता अशा प्रकारचा भारत देश हजारो वर्षापासून राहिलेला होता असून अध्यात्म त्याचा केंद्रबिंदू होता. हा भारत देश आपल्याला खेड्यांचा देश आपल्याला पुन्हा उभा करायचा आहे. आजही भारतातील 65% जनता ही खेड्यामध्ये राहते. मला छत्रपती शिक्षण मंडळाचे कौतुक वाटते की त्यांच्या शाळा ह्या ग्रामीण भागामध्ये आहेत खेड्यामध्ये आहेत. आणि या ग्रामीण भागातूनच आपण देश विकासाचे कार्य करू या असे आवाहन विनयजी कानडे यांनी केले.

 कार्यक्रमाची सुरुवात राज्य गीताने तसेच भगवदगीतेच्या अध्ययाने करण्यात आली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेचे सरचिटणीस डॉ. निलेश रेवगडे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष नारायण फडके यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे ओळख संस्था कार्यकारणी सदस्य मिलिंद कुलकर्णी यांनी केली. यावेळी संस्थापदाधिकारी श्रीकांत तरटे, विश्वास सोनवणे, सौ.मीनाक्षी गागरे चिटणीस आदी संस्था पदाधिकारी उपस्थित होते यावेळी कल्याण शहर पोलीस ठाण्याचे एसीपी साबळे हे उपस्थित होते. तसेच संस्थेचे विविध शाळांमधील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

  पुस्तके ही दीपस्तंभ प्रमाणे काम करतात समाजामध्ये क्रांती घडविण्याचे काम पुस्तके करतात म्हणून वाचन संस्कृती वाढली पाहिजे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण लागावी यासाठी मराठी राजभाषा दिनाचे निमित्ताने सक्षम संस्था व छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेच्या वतीने निबंध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये 278 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये प्रथम क्रमांक कु.मेघना मिलिंद भंगाळे इयत्ता 7वी नूतन ज्ञान मंदिर कल्याण पूर्व, द्वितीय क्रमांक कु. खंडू जायभाय मांडा टिटवाळा,


 तृतीय क्रमांक कु.प्रणाली संदीप मनोहर, मांडा टिटवाळा. तसेच इयत्ता आठवी मध्ये प्रथम क्रमांक कु. हर्षदा संतोष कांबळे नूतन ज्ञान मंदिर  कल्याण, द्वितीय क्रमांक कु. शरयू भूषण जोशी, मांडा टिटवाळा तृतीय क्रमांक कु. तनया गणेश भोईर मांडा टिटवाळा, तर इयत्ता नववी मध्ये प्रथम क्रमांक श्रीधर संतोष कापडे, द्वितीय क्रमांक कु, सिद्धी राजू केदार, मांडा टिटवाळा,तृतीय क्रमांक कु,मोहिनी रमाकांत चव्हाण, या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व रोख रकमेसह पारितोषिक देण्यात आले. 

प.स.मराठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिक्षकांच्या विचारांना चालना देण्यासाठी आंतरशालेय निबंध स्पर्धा सुद्धा संस्थेच्या विद्यमाने घेण्यात आल्या होत्या. या निबंध स्पर्धेमध्ये 66 शिक्षक सहभागी झाले होते. यामध्ये प्रथम क्रमांक सौ ममता वसावे नूतन ज्ञानमंदिर कल्याण, द्वितीय क्रमांक सौ. रुपाली जोशी विक्रमगड हायस्कूल,

 तृतीय क्रमांक सौ.अर्पिता कानिटकर विद्या मंदिर मांडा टिटवाळा, या शिक्षकांना स्मृतिचिन्ह व रोख रकमेसह  पारितोषिक देण्यात आले.

 यावेळी शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  केलेल्या कार्याची दाखल घेऊन छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांना विविध पुरस्कार  देऊन कर्मचाऱ्यांना गौरविण्यात  आले. 

यामध्ये श्री संत सर यांच्यामार्फत देण्यात येणारा अनंतराव संत पुरस्कार संस्थेतील शिक्षकेतर कर्मचारी श्रीहरी पार्टे यांना संस्था कार्याध्यक्ष श्रीकांत तरटे यांच्या हस्ते देण्यात आला.तर डॉ. दत्तात्रय अनंत संत पुरस्कार सर्वोत्कृष्ट लेखनिक पुरस्कार हिरालाल जाधव यांना, तर सौ सरस्वती अनंत संत यांच्याकडून देण्यात येणारा  सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सौ नम्रता चौधरी  मुख्याध्यापिका पूर्व प्राथमिक विभाग टिटवाळा  सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देण्यात आला.

 तर सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापिका सौ.मीनाक्षी गागरे चिटणीस कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विनयजी कानडे यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच उत्कृष्ट फलक लेखन करणारे श्रीहरी पोवळे यांचाही प्रमुख अतिथीचे हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेचे पदाधिकारी डॉ. निलेश रेवगडे कार्याध्यक्ष श्रीकांत तरटे, उपाध्यक्ष नारायण फडके, संस्था कार्यकारी सदस्य मिलिंद कुलकर्णी, विश्वास सोनवणे, मीनाक्षी गागरे, संपत गीते सर, उर्मिला जाधव,मॅडम, संस्थेतील विविध शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog