रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील घटना!

कानसई येथील महापारेषणच्या सबस्टेशनमध्ये स्फोट होऊन भीषण आग,लाखो रुपयांचे नुकसान!

   कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील कानसई येथील गावानजिक ४०० केव्ही क्षमता असलेल्या महापारेषच्या सबस्टेशनमध्ये बुधवार दि.२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास स्फोट होऊन भीषण आग लागली यावेळी येथे बाजूला असलेल्या ऑइल मुळे काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले.यामुळे या सबस्टेशनचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.


    परंतु आगीने रौद्र रूप धारण केले होते.यामुळे तातडीने जवळच असलेल्या जिंदाल कंपनीला पाचारण करण्यात आले.घटनास्थळी त्वरित अग्निशामक दलाचे कर्मचारी प्रज्वल सकपाळ व अच्युतानंद तसेच त्यांचे सहकाऱ्यांनी शर्थिचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
 

Comments

Popular posts from this blog