पहलगाम हल्ल्याविरोधात कोलाडवासियांकडून जाहीर निषेध,

 हल्ल्यात प्राण गमावलेल्या पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली!

    कोलाड (विश्वास निकम)मंगळवार दि. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मु काश्मीर मधील पहलगाम येथे भरदिवसा निर्भयपणे पर्यटन स्थळी आनंदाने फिरायला गेलेल्या निष्पाप नागरिक, लहान मुले, महिला पुरुषांवर इच्छुटपणे अंदाधुंदी अत्याधुनिक ए. के. फोर्टी शस्त्रांच्या वापर करीत भ्याड हल्ला करण्यात याचा जाहीर निषेध व तीव्र भावना व्यक्त करीत अनपेक्षित अचानक झालेल्या हल्ल्यात स्वतःच्या प्रणास मुकलेल्या हिंदुना कोलाड वाशियांकडून श्रद्धांजली वाहिली.

     भारताचा अविभाजक घटक असणाऱ्या काश्मीरमध्ये महाराष्ट्रसह इतर राज्यातील असंख्य पर्यटक सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी सहलीसाठी गेले होते.यावेळी दि.२२ एप्रिल रोजी पाकिस्तान येथील दहशतवाद्यानी पहलगाम येथे पर्यटकांवर त्यांची नावे विचारून अंधधुंदी बेचूटपणे गोळी बार केला या गोळीबारात २७ पर्यटकांचा नाहक जिव गेला याचा निषेध म्हणून कोलाड नाक्यावर सकल हिंदू समाज, सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते,एकत्रित आले होते. तसेच याचा निषेध म्हणून यानिमित्ताने शुक्रवार दि.२५ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ पर्यंत कोलाड बाजारपेठेत बंद ठेवण्यात आली होती.

      तसेच हा भ्याड हल्ला करणाऱ्यांवर फाशीची शिक्षा दयावी अशी मागणी कोलाड वाशियांकडून करण्यात आली तसेच मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी सकल हिंदू समाज तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते, सपोनि नितीन मोहिते त्यांची टीम तसेच महेशस्वामी जंगम, नारायण धनवी, चंद्रकांत लोखंडे, विजय शिंदे,एकनाथ बागुल,भरत सातांबेकर,कुमार लोखंडे,संदेश लोखंडे, डॉ.विनोद गांधी,जितु मेहता,महेंद्र वाचकवडे, गणेश वाचकवडे, शैलेश सानप,अमोल बाईत,प्रमोद लोखंडे,श्री.कुशवहा,सतिश देशमुख,भावेश जैन, निलेश गांधी,मान्सून अधिकारी,राजा जाधव,अजित दहिंबेकर,सदानंद साळूंखे,सौ.शिंदे  असंख्य व्यापारी वर्ग,रिक्षा,एपे रिक्षा,मिनिडोअर,संघटनेचे असंख्ये पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog