डॉ.श्यामभाऊ लोखंडे यांची मानव अधिकार संरक्षण समितीच्या रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती

              सर्वत्र अभिनंदनाचा           वर्षाव!

कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील चिल्हे गावाचे सुपुत्र रायगड भुषण पत्रकार डॉ.श्यामभाऊ यशवंत लोखंडे यांची मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या संघटनेच्या रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रोहा तालुका जनसंपर्क प्रमुख पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली भारत या दोन्ही पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून सरकार अभिनंदन करण्यात येत आहे.

डॉ. श्यामभाऊ लोखंडे हे सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रात अग्रेसर असलेले पत्रकार असुन त्यांनी  सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरी बद्दल त्यांना बंगलोर विद्यापीठाची मानद डॉक्टरेड पदवी बहाल करण्यात आली याच जोरावर त्यांना रायगड भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.तसेच रोहा तालुका कुणबी समाजोन्नती संघ तसेच ओबीसी समन्वय समितीच्या खांब विभागीय अध्यक्षपदी काम करीत आहेत तसेच कोलाड रोहा लायन्स क्लबच्या उपाध्यक्षपदी लोकहिताचे काम करीत असताना त्यांची नुकतीच मानव अधिकारी संरक्षण समिती नवी दिल्ली या संस्थेच्या वतीने रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली यांच्या वतीने रोहा तालुका जनसंपर्क अधिकारी म्हणून निवड करण्यात आली त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली, भारत या संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष सतीषदादा चौधरी यांच्या आदेशानुसार, गजानन भगत राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख यांच्या सूचनेनुसार,सुनिलभाऊ पाटील अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश यांच्या सहमतीने, डॉ.कृष्णकांत मल्हारी पाटील रायगड जिल्हा जनसंपर्क प्रमुख यांच्या शिफारशीनुसार रायगड भुषण पत्रकार डॉ. श्यामभाऊ लोखंडे यांची मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली यांच्या रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे. तसेच पोलीस मित्र संघटना रोहा तालुका जनसंपर्क अधिकारी या दोन्ही पदी नियुक्ती झाली असुन या निवडीबद्दल त्याचे कोलाड रोहा लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य, कुणबी खांब ग्रुपचे सर्व पदाधिकारी व सदस्य, रोहा तालुका कुणबी समाज सर्व पदाधिकारी व सदस्य, रोहा तालुका ओबीसी समाजाचे पदाधिकारी व सर्व सदस्य, पत्रकार मित्र, तसेच आदिवासी समाजातुन व विविध क्षेत्रातील पदाधिकारी व सर्व सदस्य यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog