रोहा तालुक्यातील घटना!
आंबेवाडी नाका येथे रस्त्यावर आढळला मृतदेह सर्वत्र एकच खळबळ!
कोलाड (विश्वास निकम )रोहा तालुक्यातील तसेच मुंबई गोवा महामार्गालगत आंबेवाडी नाका येथे बुधवार दि. ९ एप्रिल रोजी ९.३० वाजता आंबेवाडी गावाच्या हद्दीत बँक ऑफ महाराष्ट्र इमारती शेजारी असणारे गणेश मंदिरासमोर बायपास रोडच्या शेजारी उताने स्थितीत कोणत्याही प्रकारची हालचाल न करता मयत इसमाचा मृतदेह आढलून आल्याची खळबळजनक घटना घडली त्यामुळे कोलाड आंबेवाडी नाक्यावर एकच खळबळ उडाली.
सदर घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते घटनास्थनी धाव घेत दाखल होऊन त्याला आंबेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत्यू घोषित करण्यात आले.असुन मयत झालेल्या इसमाचे नाव लालूलाल सोनजी रेबाली वय वर्षे ४१ रा. बिछोरा जि. चितोडगड,राजस्थान येथील असल्याचे तपासादरम्यान समजले असुन त्याचा मृत्यू कोणत्या तरी आजाराने झाला असल्याचे समजते मात्र अधिक तपास कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली एन. झेड. सुखदेवे करीत आहेत.
Comments
Post a Comment