रोहा तालुका कुणबी समाजाची सभा मोठ्या उत्साहात संपन्न
कोलाड (विश्वास निकम) कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा तालुका रोहाची सभा शनिवारी २९ मार्च रोजी कुणबी समाज नेते तथा माजी आमदार स्व.पां.रा. सानप कुणबी भवन रोहा येथे रोहा तालुका अध्यक्ष रामचंद्र सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली तर आयोजित सभेस तालुक्यातील कुणबी समाज कार्यकारणी पदाधिकारी व कुणबी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर यावेळी कुणबी समाज समन्वय समिती मुंबई संघ सदस्य नेते सुरेश मगर, उपाध्यक्ष अनंत थिटे, माजी अध्यक्ष शिवराम शिंदे, शिवराम महाबळे,संतोष खेरटकर, सतिश भगत, मारुती मालुसरे, सुहास खरिवले, शशी कडु, मोरेश्वर खरिवले,गृप अध्यक्ष.खेळु ढमाल, निवास खरिवले, पांडुरंग कडु, दिलीप अवाद, राजेश कदम , पांडुरंग कोंडे जेष्ठ नेते बाबुराव बामणे, वसंतराव मरवडे, दगडु शिगवन, नरेंद्र सकपाळ, गोपिनाथ गंभे,तसेच अनंता वाघ,परशुराम भगत, मंगेशशेठ सरफळे, महेश ठाकुर,चंद्रकांत लोखंडे.सह तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी व आदी कुणबी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
तर आयोजित करण्यात आलेल्या या कुणबी समाजाच्या बैठकीत जातीचा दाखल्याबाबत पुढील नियोजन करण्यात आले आहे. तर सुरू असलेल्या या लढ्यासाठी समिती तयार करण्यात आली आहे. त्या समिती मध्ये गृप अध्यक्ष व एक विभागातील सदस्य असणार आहे. तसेच प्रत्येक गावतील सर्वे केला जाणार असून त्याकरिता प्रत्येक गावातील दोन युवक यांची नेमणुक केली जाणार व त्यांना सर्वे बाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. कारण शासन दरबारी , कायदेशीर लढाई, समाजकल्याण विभाग यांचा कडे न्याय मागण्या साठी प्रथम आपण तालुक्यात 65% आहोत ते कागदावर येणे आवश्यक आहे. या बाबत नियोजन करण्यात येणार असल्याची चर्चा केली.तर सदरच्या या लढाई मध्ये आपल्या सर्वांनी एकत्र येऊन आपल्या पुढील पिढी करीता योगदान देणे गरजेचे आहे. तरुणांनी पुढे येऊन गावनिहाय सर्वे करिता मोठे सहकार्य करावेत असे आवाहन नेते सुरेश मगर आणि तालुका अध्यक्ष रामचंद्र सकपाळ यांनी केले.
तसेच नव्याने विभागावर निवड करण्यात आलेल्या राजेश कदम कोलाड गृप अध्यक्ष पदी, पांडुरंग कोंडे चणेरा अध्यक्ष पदी.सौ दीपका भगत रोहा तालुका महिला आघाडी, त्याच बरोबर सुरेशजी मगर साहेब यांची आर्ट ऑफ लिव्हिंग तर शिवरामभाऊ शिंदे यांची दिशा कमेटीवर निवड झाल्याने यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा देत त्यांचा सत्कार करण्यात आला. व शेवटी उपस्थित समाज बांधवांचे आभार मानून सांगता कऱण्यात आली.
Comments
Post a Comment