ग्रुप ग्रामपंचायत कोलाड तसेच कोलाड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सायकल रॅलीचे भव्य स्वागत

  कोलाड:-(विश्वास निकम) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF)आपल्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त 'सुरक्षित तट-समृद्ध भारत'या संकल्पनेवर आधारित एक अभिनव सायकल मोहिमेचे अर्थात सायक्लोथॉनचे ७ मार्च पासून आयोजन करण्यात आले असुन तीचे आगमन कोलाड येथे गुरुवार दि. २० मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता झाले या भव्य रॅलीचे ग्रुप ग्रामपंचायत कोलाड तसेच कोलाड पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने पुष्प सुमने व फटाक्याच्या आताषबाजीने करण्यात आले.

 यावेळी कमांडर राममोहन सर JNPA सेवा,असिस्टंट कमांडर राममूर्ती सर,सतिश कदम सर CISF PI, कोलाड पोलीस स्टेशनचे सपोनि नितीन मोहिते,अंमलदार नरेश पाटील,रोहा तालुका महिला अध्यक्षा प्रितम पाटील,ग्रुप ग्रामपंचायत कोलाड सरपंच शर्मिला सागवेकर,उपसरपंच उत्तम बाईत,श्रीकांत चव्हाण,संतोष बाईत, रविंद्र सागवेकर,अब्दुल्ला अधिकारी, रविंद्र तारू,संजय लोटणकर, संजय कुर्ले, महेशस्वामी जंगम,कोलाड परिसरातील असंख्य पोलीस पाटील असंख्य महिला वर्ग व तरुण उपस्थित होते.

           केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ७ मार्च रोजी आभासी पद्धतीने गुजरात येथून सुरवात झाली असुन  या मोहिमेत सहभागी झालेले सायकल पट्टू देशाच्या ६५५३ कि.मी. लांबीच्या किनारपट्टीलगत सायकलने प्रवास करणार असुन हा प्रवास ३१ मार्च पर्यंत २५ दिवस सुरु राहणार असुन या कार्यक्रमा अंतर्गत सागरी सुरक्षेबाबत जनजागृती – किनारी प्रदेशातील नागरिकांना अमली पदार्थ, शस्त्रास्त्र आणि स्फोटकांची तस्करी यांसारख्या संभाव्य धोक्यांबाबत जागरूक करणे.सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक नागरिकांमधील परस्पर सहकार्य वाढवणे, यादृष्टीने सुरक्षाविषयक सतर्कता वाढवण्याचा प्रयत्न करणे, तसेच नागरिक आणि सुरक्षा यंत्रणांमधला समन्वय अधिक दृढ करणे.देशभक्तीची भावना जागृत करणे नागरिकांना स्वातंत्र्य सैनिक, सुरक्षा दलांचे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागाची जाणीव करून देणे.भारताच्या सागरी परंपरांचा सन्मान करणे नागरिकांना आपल्या किनारपट्टी प्रदेशातील समृद्ध परंपरा, इतिहास आणि भौगोलिक विविधतेची ओळख करून देणे तसेच या भागाच्या राष्ट्रीय विकासातील योगदान अधोरेखित करणे.असे या मोहिमेचे व सायकल रॅलीचे उद्दिष्ट आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले.

Comments

Popular posts from this blog