रायगड जिल्हातील रोहा तालुक्यातील घटना!

वृद्ध महिलेची सोनसाखळी खेचून पळून जाणाऱ्या जोडप्याला रोहा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने  पाठलाग करून अखेर आवळल्या नवरा बायकोच्या मुसक्या!

रोहा पोलिसांच्या कामगिरीचे रायगड जिल्ह्यात भरभरून कौतुक!

कोलाड(विश्वास निकम) चणेरा मार्गावरील भागीरथीखार येथे एक वृध्द महिला नीलिमा नारायण वरसोलकर( ६५ वर्षे  रा.भागीरथीखार ता.रोहा ) या सुखी मच्छी विकत असताना सदर ठिकाणी एक नवरा बायको जोडपे गाडी वरून येऊन थोडी सुखी मच्छी विकत घेतली. मच्छी विक्री करणाऱ्या महिलेच्या गळ्यात सोनसाखळी असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर ते दोघे  शेडसई बाजूकडे निघून गेले. काही वेळानंतर त्वरीत त्यांनी हेल्मेट घालून तोंडाला रुमाल बांधून सदर वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील ३ तोळ्याची सोन्याची चैन जबरदस्तीने खेचून तेथून रोहे शहराच्या दिशेने पळ काढला.

या घटनेनंतर घाबरलेल्या वृद्ध महिलेने आरडाओरड केल्याने तेथील जागरूक नागरिकांनी ताबडतोब रोहा पोलीस स्टेशन येथे संपर्क करुन सदर घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून खारी चेकपोस्ट येथे पोलीस अमलदारांसह नाकाबंदी लावली. काही वेळातच गुन्ह्यातील पळ काढणारे जोडपे खारी चेकपोस्ट येथे आले असता नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता वेगाने गाडी पळवून तांबडी गावाकडे पळून गेले. नाकाबंदी करणारे पोलिसांनी त्यांचा दुचाकीवरून पाठलाग सुरू केला. पोलीस पाठीमागे लागल्याचे पाहताच आरोपी जोडप्याने वेगाने गाडी पळविली मात्र त्याच वेगाने पोलिसानी पाठलाग करून अत्यंत चपळाईने त्यांना काही अंतरावरच रोखून ताब्यात घेतले. आणि त्या आरोपींकडून चोरलेली ३ तोळ्याची सोनसाखळी हस्तगत केली. या आरोपीना ताब्यात घेवून चौकशी केली असता नितीन सुरेश गुंडीये आणि मोहिनी नितीन गुंडिये असे त्यांचे नाव आहे हे गुन्हेगार जोडपे  गोरेगाव- मुंबई येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.रोहा पोलीस ठाण्यात गुंडीये दाम्पत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog