आदर्श शिक्षक समिती रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदी सौ. अमिता बामणे यांची निवड

  कोलाड (विश्वास निकम) आदर्श शिक्षक समिती रायगड ची जिल्हा कार्यकारणी सभा गुरुवार दिनांक २६ मार्च २०२५ रोजी पी. एम. श्री. आदर्श केंद्र शाळा कोलाड येथे अजय अविनाश कापसे जिल्हाध्यक्ष  तथा स्विकृत सदस्य, शिक्षण व क्रीडा समिती रायगड जिल्हा परिषद अलिबाग  यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाली. सभेस जिल्हाभरातून समितीचे बहुसंख्येने पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

सदर सभेत आदर्श शिक्षक समितीच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदी.B. Ed., M. Ed., SET पात्रता धारक, सौ. अमिता गजानन बामणे  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 

शिक्षण, कला,क्रीडा सहकार व समाजसेवेचा निसर्गदत्त कौटुंबिक वारसा लाभलेल्या तसेच कोलाड रोहा लायन्स क्लबच्या सदस्या सेवाभावी संस्थेचे काम अविरतपणे चालत असलेल्या प्राथमिक शिक्षिका सौ. अमिता  गजानन बामणे  या प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी रोहाच्या विद्यमान संचालिका असून त्यांची

त्यांच्या या निवडीबद्दल आदर्श शिक्षक समिती कोकण विभाग प्रमुख सौ. प्रसाद म्हात्रे व जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी सभेत नियुक्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित केले.  

आदर्श शिक्षक समितीच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल सौ. अमिता गजानन बामणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog