गोवे येथे शिवजयंती उत्सव विविध कार्यक्रमानी साजरा व्यसनाधीनतेच्या समस्येवर मोफत मार्गदर्शन!

   कोलाड :-(विश्वास निकम )सोमवार दि. १७ मार्च २०२५ रोजी जय हनुमान मित्र मंडळ गोवे आयोजित शिवजयंती उत्सव (स्थितीप्रमाणे )विविध कार्यक्रमानी मोठया उत्साही वातावरणात साजरा  करण्यात आला तसेच यानिमित्ताने दारूच्या तथा व्यसनाधीनतेच्या  समस्येवर मोफत मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

    शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने रविवार दि. १६ मार्च रोजी गोवे येथून किल्ला रायगड कडे प्रस्थान, यानंतर गड सर करून जगदीश्वराच्या मंदिरात आरती व मशाल पूजन,रात्री १ नंतर मशाल परतीची धाव, सोमवार दि.१७ मार्च रोजी सकाळी ९ वाजता कोलाड मायभावनी येथे मशाल पूजन करण्यात आले नंतर गोवे येथील शिवाजी चौक येथे प्रवेश व महाराजांची आरती करण्यात आली.

  तसेच दुपारी ३ वाजता महाराजांची पालखी व भव्य मशाल मिरवणूक सोहळा,व आरती यानंतर रात्री ८. वाजता दारू समस्येवर अल्कोहोलिक अँनॉनिमस यांच्या मार्फत महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी अल्कोहोलिक अँनॉनिमसचे असंख्य मार्गदर्शक,खांब विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव,कोलाड विभागीय अध्यक्षा सुप्रिया जाधव,उपसरपंच निशा जवके,जेष्ठ कार्यकर्ते तानाजी जाधव,संदीप जाधव,नितीन जाधव,गाव कमेटी अध्यक्ष बळीराम जाधव,सचिव श्रीधर गुजर,भरत जाधव,सर्व पदाधिकारी व सदस्य,तसेच नामदेव जाधव,सुरेश जाधव,नंदा जाधव,राजेश शिर्के,कमलाकर शिर्के,मनोहर मांजरे,महादेव जाधव,पांडुरंग जाधव,महेंद्र जाधव,नंदा वाफिलकर,रामचंद्र कापसे,तसेच असंख्य समस्त ग्रामस्थ महिला मंडळ व तरुण वर्ग उपस्थित होते.

                   तसेच रात्री ११ वाजता छावा चित्रपट दाखविण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश जाधव यांनी केले सर्व कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी जय हनुमान मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, ग्रामस्थ मंडळ व महिला वर्ग यांनी मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog