Posts

Showing posts from March, 2025
Image
  रायगड जिल्हातील रोहा तालुक्यातील घटना! वृद्ध महिलेची सोनसाखळी खेचून पळून  जाणाऱ्या जोडप्याला रोहा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने   पाठलाग करून अखेर आवळल्या नवरा बायकोच्या मुसक्या! रोहा पोलिसांच्या कामगिरीचे रायगड जिल्ह्यात भरभरून कौतुक! कोलाड(विश्वास निकम) चणेरा मार्गावरील भागीरथीखार येथे एक वृध्द महिला नीलिमा नारायण वरसोलकर( ६५ वर्षे  रा.भागीरथीखार ता.रोहा ) या सुखी मच्छी विकत असताना सदर ठिकाणी एक नवरा बायको जोडपे गाडी वरून येऊन थोडी सुखी मच्छी विकत घेतली. मच्छी विक्री करणाऱ्या महिलेच्या गळ्यात सोनसाखळी असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर ते दोघे  शेडसई बाजूकडे निघून गेले. काही वेळानंतर त्वरीत त्यांनी हेल्मेट घालून तोंडाला रुमाल बांधून सदर वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील ३ तोळ्याची सोन्याची चैन जबरदस्तीने खेचून तेथून रोहे शहराच्या दिशेने पळ काढला. या घटनेनंतर घाबरलेल्या वृद्ध महिलेने आरडाओरड केल्याने तेथील जागरूक नागरिकांनी ताबडतोब रोहा पोलीस स्टेशन येथे संपर्क करुन सदर घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून खारी चे...
Image
  कु.विश्वा आटपाडकर प्रवेश परीक्षा उत्तीर्ण विविध स्तरावरून अभिनंदन!     कोलाड :-(विश्वास निकम)   रोहा तालुक्यातील द.ग. तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवाडी येथील शिक्षण घेणारी कुमारी विश्वा गजेंद्र आटपाडकर ही जवाहर नवोदय विद्यालयामधील प्रवेश परीक्षा मोठया मेहनतीने उत्तीर्ण झाली.असुन तीचे या यशाबद्दल विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.  कु. विश्वा आटपाडकर हिने केलेली जिद्द व चिकाटी याच्या जोरावर मोठया मेहनतीने अभ्यास करून प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन आई-वडिलांचे नाव रोशन केले. तीचे वडील गजेंद्र हे खाण कामगार असुन तीची आई प्रियांका गृहिणी आहे.तिच्या पालकांची इच्छा होती की आपल्या मुलीने जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घ्यावे अशी होती.हे वडिलांचे स्वप्न मुलीने पूर्ण केले आहे.कु.विश्वा हिच्या यशा बद्दल द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवाडीचे मुख्यध्यापक श्री. एस जी. काळे सर,श्री.एस.पी. मोटे,श्री.एस.पी.शिंदे श्री.,एस. व्ही. मरवडे,श्री.डी. व्ही. पोटफोडे,श्री.व्ही. बी. कालेकर,श्री.आर. आर. डोंगरदिवे,सौ.पी. पी दळवी,सौ.सी. सी वरखले,सौ.एन. एन काफरे,सौ.व्ही.जे.शेळके...
Image
  आदर्श शिक्षक समिती रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदी सौ. अमिता बामणे यांची निवड    कोलाड (विश्वास निकम) आदर्श शिक्षक समिती रायगड ची जिल्हा कार्यकारणी सभा गुरुवार दिनांक २६ मार्च २०२५ रोजी पी. एम. श्री. आदर्श केंद्र शाळा कोलाड येथे अजय अविनाश कापसे जिल्हाध्यक्ष  तथा स्विकृत सदस्य, शिक्षण व क्रीडा समिती रायगड जिल्हा परिषद अलिबाग  यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाली. सभेस जिल्हाभरातून समितीचे बहुसंख्येने पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. सदर सभेत आदर्श शिक्षक समितीच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदी.B. Ed., M. Ed., SET पात्रता धारक, सौ. अमिता गजानन बामणे  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.  शिक्षण, कला,क्रीडा सहकार व समाजसेवेचा निसर्गदत्त कौटुंबिक वारसा लाभलेल्या तसेच कोलाड रोहा लायन्स क्लबच्या सदस्या सेवाभावी संस्थेचे काम अविरतपणे चालत असलेल्या प्राथमिक शिक्षिका सौ. अमिता  गजानन बामणे  या प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी रोहाच्या विद्यमान संचालिका असून त्यांची त्यांच्या या निवडीबद्दल आदर्श शिक्षक समिती कोकण विभाग प्रमुख सौ. प्रसाद म्हात्...
Image
  मुंबई-गोवा हायवेवरील दुतर्फा रस्त्याच्या मधोमध लावण्यात आलेली फुलझाडे गेली सुकून!   नियोजना अभावी लाखो लिटर पाणी तसेच लागवडीचा खर्च गेला वाया,अद्यापही सावलीची प्रतीक्षा! करोडो रुपये घेऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा:-जनतेची मागणी!   कोलाड:- (विश्वास निकम )  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील दुतर्फा रस्त्याच्या मधोमध लाखो फुलझाडे लावण्यात आली असुन त्याचा नियोजन मात्र शुन्य असल्यामुळे नको त्या वेळी पाणी मारून लाखो लिटर पाणी वाया जात असुन लावण्यात आलेली फुलझाडे सुकून गेली व शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया जात असल्याचे दिसून येत आहे.तसेच रस्त्याच्या दुतर्फा उंच झाडे लावली गेली नसल्याने प्रवाशी वर्गाला सावळीची प्रतीक्षा करावी लागत आहे.                   मुंबई-गोवा हायवेवर नंदनवन फुलावा या उद्देशाने दुतर्फा रस्त्याच्या मधोमध फुलझाडे लावण्यात आली परंतु ही फुलझाडे जुन महिन्यात पावसाळा सुरु झाल्यानंतर लावली असती तर ती जगली असती परंतु पावसाळा संपल्यावर ही फुलझाडे लावण्यात आली  त्यांना वेळेवर पाणी न ...
Image
  ग्रुप ग्रामपंचायत कोलाड तसेच कोलाड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सायकल रॅलीचे भव्य स्वागत    कोलाड:-(विश्वास निकम)   केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF)आपल्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त 'सुरक्षित तट-समृद्ध भारत'या संकल्पनेवर आधारित एक अभिनव सायकल मोहिमेचे अर्थात सायक्लोथॉनचे ७ मार्च पासून आयोजन करण्यात आले असुन तीचे आगमन कोलाड येथे गुरुवार दि. २० मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता झाले या भव्य रॅलीचे ग्रुप ग्रामपंचायत कोलाड तसेच कोलाड पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने पुष्प सुमने व फटाक्याच्या आताषबाजीने करण्यात आले.  यावेळी कमांडर राममोहन सर JNPA सेवा,असिस्टंट कमांडर राममूर्ती सर,सतिश कदम सर CISF PI, कोलाड पोलीस स्टेशनचे सपोनि नितीन मोहिते,अंमलदार नरेश पाटील,रोहा तालुका महिला अध्यक्षा प्रितम पाटील,ग्रुप ग्रामपंचायत कोलाड सरपंच शर्मिला सागवेकर,उपसरपंच उत्तम बाईत,श्रीकांत चव्हाण,संतोष बाईत, रविंद्र सागवेकर,अब्दुल्ला अधिकारी, रविंद्र तारू,संजय लोटणकर, संजय कुर्ले, महेशस्वामी जंगम,कोलाड परिसरातील असंख्य पोलीस पाटील ...
Image
  गोवे येथे शिवजयंती उत्सव विविध कार्यक्रमानी साजरा व्यसनाधीनतेच्या समस्येवर मोफत मार्गदर्शन!     कोलाड :-(विश्वास निकम ) सोमवार दि. १७ मार्च २०२५ रोजी जय हनुमान मित्र मंडळ गोवे आयोजित शिवजयंती उत्सव (स्थितीप्रमाणे )विविध कार्यक्रमानी मोठया उत्साही वातावरणात साजरा  करण्यात आला तसेच यानिमित्ताने दारूच्या तथा व्यसनाधीनतेच्या  समस्येवर मोफत मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले.     शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने रविवार दि. १६ मार्च रोजी गोवे येथून किल्ला रायगड कडे प्रस्थान, यानंतर गड सर करून जगदीश्वराच्या मंदिरात आरती व मशाल पूजन,रात्री १ नंतर मशाल परतीची धाव, सोमवार दि.१७ मार्च रोजी सकाळी ९ वाजता कोलाड मायभावनी येथे मशाल पूजन करण्यात आले नंतर गोवे येथील शिवाजी चौक येथे प्रवेश व महाराजांची आरती करण्यात आली.   तसेच दुपारी ३ वाजता महाराजांची पालखी व भव्य मशाल मिरवणूक सोहळा,व आरती यानंतर रात्री ८. वाजता दारू समस्येवर अल्कोहोलिक अँनॉनिमस यांच्या मार्फत महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी अल्कोहोलिक अँनॉनिमसचे असंख्य मार्गदर्शक,खांब विभागीय अध्यक्ष नरेंद्...
Image
  मुंबई गोवा महामार्गांवर सुकेळी खिंडीत तीव्र उतारावर ट्रेलर पलटी, वाहन चालक आत अडकून गंभीर जखमी कोलाड (विश्वास निकम):- मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील सुकेली खिंडीत तीव्र उतारावर रविवार दि. १६ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास गोवा बाजूकडून मुंबई बाजुकडे जात असतांना वरील नमूद करण्यात आलेल्या ठिकाणी ट्रेलर क्रमांक एम एच ४३, बी.जी. ६८३७ या क्रमांकांच्या  ट्रेलरवर ताबा सुटल्यामुळे गाडी डिवाडरला धडकून टेलर पलटी झाला.       या अपघातात ट्रेलर चालक नितीन कुमार यादव वय वर्षे २५ राहणार लखनो,उत्तरप्रदेश हा केबिनमध्ये अडकून त्याच्या पायाला हाताला गंभीर दुखपत झाली.  त्याला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढून त्याला उपचारासाठी जिंदाल हॉस्पिटल सुकेली येथे हलविण्यात आले सदर अपघात स्थळी कोलाड रेस्क्यू टीमने खूप मेहनत घेतली त्यानंतर सदर वाहतूक दोन्ही साईडच्या लेन द्वारे सुरळीत सुरु करण्यात आली.अधिक तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे सपोनि जी.बी.जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस  अंमलदार करीत आहेत.
Image
  रायगड जिल्ह्यातील घटना!  वणवा पेटला केले रुद्ररूप धारण, रोहा इंदरदेव येथील डोंगराला अचानक वनवा, चाळीस ते पन्नास घरे जळून खाक, वनसंपदेची प्रचंड हानी प्रांताधिकारी, तहसीलदार,यांनी घटनास्थळी धाव घेत केली पाहणी   मतांसाठी लोटांगण घालणारे नेते गेले कुठे जनतेचा सवाल?   निवडणुका जवळ आल्या असत्या तर रायगडातील नेत्यांच्या रांगच रांगा लागल्या असत्या! कोलाड (विश्वास निकम) रोहा तालुक्यातील धामणसई ग्राम पंचायत हद्दीतील डोंगर माथ्यावर असलेल्या इंदरदेव धनगरवाडी येथे अचानक डोंगराला वणवा लागल्याने सदरच्या वनव्याने रुद्ररूप धारण केल्याने वस्तीतील चाळीस ते पन्नास घरे या वनव्यात जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.मात्र दैव बलवत्तर घडलेल्या घटनेत कोणतेही जिवीत हानी घडली नाही. परंतु आगीत घरांचे खूप मोठे नुकसान झाले त्याच बरोबर वनसंपदेची देखील प्रचंड हानी झाली असून धनगरवाडीवरील ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले. रोहयाचे कार्यतत्पर कर्तव्यदक्ष प्रांत अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांना धीर देत केली पाहणी. वन विभागाचा हलगर्जीपना अखेर वाडीवर ग्रामस्थांच्या घरांवर बेतला डोंगर ...
Image
  वणव्याच्या भडक्यामुळे गोवे येथील बगायतदारांचे आंबा, काजु जळून खाक,हातातोंडांशी आलेला घास क्षणात उध्वस्त,शेतकऱ्यांचे मोठे नुकसान    रोहा तालुक्यातील घटना!    कोलाड (विश्वास निकम )  रोहा तालुक्यातील गोवे येथील बागायतदार शेतकऱ्यांचे  वणव्याच्या भडक्यामुळे आंबा, काजु, यांची कलमे जळून खाक झाली असुन या वणव्याच्या भडक्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडांशी आलेला घास क्षणात हिरावून नेला आहे.       बुधवार दि.५ मार्च रोजी  दुपारच्या सुमारास अचानक वणवा पेटला आणि काही क्षणात वणव्याने रौद्ररूप धारण केले.बघता बघता सर्व बागेत वणवा पसरला आणि या वणव्यात आंबा,काजु,चिकु,फणस यांचे झाडे भस्मसात झाली आहेत.यामुळे आंब्याला बाजलेल्या कैऱ्या सुकून गेल्या तर काही कैऱ्या गळून पडल्या असल्यामुळे येथील शेताकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.लागलेल्या आगीचे कारण समजू शकले नाही.       या वणव्यामुळे गोवे येथील शेतकरी नंदा शिवराम वाफिळकर यांचे १० ते १२ आंबा व काजु यांची कलमाची झाडे तसेच निलेश चंद्रकां...
Image
  श्री गणेश गोवे आयोजित क्रिकेट सामन्यात जय भवानी चिंचवली संघ अंतिम विजेता   कोलाड (विश्वास निकम )  गोवे येथील महिसदरा नदी तिरावरील निसर्गरम्य ठिकाणी  रविवार दि.२ मार्च २०२५ रोजी गोवे खांब ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पर्व ५ यांच्या मान्यतेने श्री गणेश गोवे   यांच्या तर्फे क्रिकेट सामान्यांचे आयोजन करण्यात आले  या क्रिकेट सामन्यात जय भवानी चिंचवली संघ अंतिम विजेता संघ ठरला.      या स्पर्धेचे उद्धघाटन विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव,विभागीय अध्यक्षा सुप्रिया जाधव,माजी उपसरपंच संदिप जाधव, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष पांडुरंग जाधव, तसेच गोवे खांब ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष नितेश मुंडे,सेक्रेटरी शरद वारकर,उपसेक्रेटरी शिरीष दळवी, खजिनदार अंकेत खैरे उपखजिनदार रोशन पवार,श्री गणेश गोवे संघाचे पदाधिकारी व सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.   या क्रिकेटच्या अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात जय भवानी चिंचवली संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी संघ ठरला,तर श्री सोमजाई कोलाड संघाला  द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले,...