
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण, कल्याणच्या नूतन विद्यालयाच्या प्रांगणात 'शिवकल्याण राजा' अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सादर, चिमुकल्यांच्या हातांनी सजलेल्या 'शिवकल्याण राजा'या हस्तलिखिताचे झाले प्रकाशन.... कल्याण ( प्रतिनिधी )छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष* पूर्ण झाली.याच प्रसंगाचं औचित्य साधून छत्रपती शिक्षण मंडळाच्या नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण (पूर्व प्राथमिक,प्राथमिक,माध्यमिक) येथे संपूर्ण वर्षभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक कार्यक्रम करण्यात आले. दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी नूतन विद्यालयाच्या भव्य प्रांगणात *शिवकल्याण राजा* हा अनोखा कार्यक्रम सादर करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ, छत्रपती शिवरायांचा जन्मकाळ, स्वराज्यासाठी लढलेल्या अनेक मावळ्यांचा लढा आणि छत्रपतींचा राज्याभिषेक असे अविस्मरणीय नाट्य सादरीकरण या निमित्ताने करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी 350 दिवे प्रज्वलित क...