
प्रथमच साबळे स्मृती प्रतिष्ठान व छेडा गृप, संयुक्तपणे खास "माणगांव महोत्सव २०२३"चे आयोजन उतेखोल / माणगांव दि.३ नोव्हेंबर(रविंद्र कुवेसकर) शुक्रवार दिनांक ०३ नोव्हें.२०२३ रोजी सायंकाळी ०६.०० वा. लोकनेते अशोकदादा साबळे विद्यालयातील मोरेश्वर सभागृहात लोकनेते अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक ॲड. राजीव साबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तसेच प्रतिष्ठान अध्यक्ष समाधान उतेकर, कार्यकारी अध्यक्ष अरुण क्षिरसागर, उद्योजक नितीन बामुगडे, नगरीचे आरोग्य व स्वच्छता सभापती दिनेश रातवडकर, नगरसेविका तथा महिला संघटक शर्मिला सुर्वे, प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा स्वाती जाधव, साबळे विद्यालय मुख्याध्यापक धनाजी जाधव, दिलीप उभारे यांच्या उपस्थितीत प्रतिष्ठान कार्यकारिणी सदस्य व महिला सदस्य यांची संयुक्तीक सभा संपन्न झाली. या भव्य महोत्सवाचे उदघाटन दि. ४ नोव्हे. रोजी महोत्सवाचे आयोजक हितेनशेठ छेडा, प्रमिला छेडा तसेच साबळे स्मृती प्रतिष्ठानचे प्रमुख ॲड. राजीव साबळे सर्व सदस्य व माणगावकरांचे खास उपस्थितीत संपन्न होणार असुन लोकनेते अशोक दादा साबळे स्मृती प्रति...