
घोसाळगडाच्या पायथ्यालगत मातीत लोप पावलेली चतुर्भुज विरगळाचे शिवऊर्जा मित्र मंडळाने केले पुनर्वसन! इतिहासाला उजाळा देण्याचे शिवऊर्जा मित्र मंडळाचे कौतुकास्पद कार्य! रोहा (राजेश हजारे) आपला इतिहास हा वास्तूचे रूपात जिवंत असतो तो कायम टिकवा त्याकरीता पुरातत्त्व विभाग काम करत आहे पण आपल्या दैदीप्यमान इतिहास आहे तो जिवंत राहावा पुढच्या पिढीला याची माहिती व्हावी म्हणून माझी भारतीय नागरिक म्हणून माझे काहीतरी कर्तव्य आहे जबाबदारी आहे आणि याच भावनेतून इतिहास जिवंत राहावा कायम टिकावा यासाठी शिव ऊर्जा मित्र मंडळ गेली अनेक वर्ष झटत आहे. नुकतेच घोसाळगडाच्या पायथ्यालगत मातीत लोक पावलेली चतुर्भुज विरगळाची शिव ऊर्जा मित्र मंडळांनी पुनर्वसन केले असून या कामगिरीने संबंध रायगड जिल्ह्यातून शिव ऊर्जा मित्र मंडळावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की स्वराज्याचा साक्षीदार असलेला घोसाळगड ऊर्फ विरगडाच्या पायथ्यालगत गावाबाहेर शिवमंदिर आहे या शिवमंदिरा जवळच दोन पुरातन विहीरी व तलाव आहे त्याची पहाणी करीत असताना चौकोनी पु...