
रोहा येथील मुक्त पत्रकार राजेश हजारे यांना मातृशोक रोहा(प्रतिनिधी) रोहा येथील मुक्त पत्रकार तसेच आदिवासी, शोषित, वंचिताचे प्रश्न नेहमी आपले लेखणीतून मांडणारे ज्येष्ठ पत्रकार राजेश वामन हजारे यांच्या मातोश्री कै. मंगलाताई वामन हजारे यांचे डोंबिवली येथे वृद्धपकाळाने निधन झाले. सार्वजनिक जीवनात रोह्यामध्ये हजारे काकू म्हणून सर्वांना परिचित असलेल्या शांत, मनमिळाऊ, प्रेमळ, सत्वशील सरळ मार्गी, कष्टाळू, म्हणून परिचित असलेल्या तसेच सामाजिक कार्यात नेहमी हातभार लावणाऱ्या तसेच विश्व् हिंदू परिषदेच्या माजी जेष्ठ कार्यकर्त्या, दुर्गादेवी सत्संग मंडळाच्या मंडळाच्या ज्येष्ठ कार्यशील सदस्या श्रीमती मंगलाताई वामन हजारे यांचे नुकतेच वृद्धपकाळाने डोंबिवली येथे निधन झाले. धार्मिक अध्यात्मिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असायचा त्यांना अध्यात्माची त्यांना आवड असल्याने विविध धर्मग्रंथांचे वाचन नामस्मरणव्रत वैकल्ये करण्याची त्यांना आवड होती. दुर्गादेवी सत्संग मंडळाच्या अध्वर्य कै. विमलाताई मेहेंदळे यांच्या त्या निकटवर्तीय होत्या...