
रोहा वरसे ग्राम पंचायत कचरा डंपिंग ग्राउंड प्रश्न ऐरणीवर, लवकरात जागा उपलब्ध करून मिळावी रोहा तहसीलदार यांना दिले निवेदन! कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील वरसे ग्राम पंचायत हद्दीतील कचरा डंपिंग समस्या गेली पंधरा दिवसांपासून मोठी अडचणीची ठरली आहे जागे अभावी घनकचरा कोठेही फेकता येत नसल्याने ही गंभीर समस्या ग्राम पंचायतीसमोर झाली असून शासनाकडून जागा उपलब्ध करून मिळावी याकरता सोमवारी 31 ऑक्टोबर रोजी ग्राम पंचायतीच्या वतीने रोहा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. ग्रामपंचायती हद्दीतील वाढती लोखंसंख्या पाहता दिवसेंदिवस घनकचऱ्यात देखील वाढ झाली आहे त्यामुळे शासनाकडून कचरा डंपिंग ग्राउंड याकरता जागा उपलब्ध करून मिळावी यासाठी ग्राम पंचायतीचे विद्यमान सरपंच नरेशशेठ पाटील,उपसरपंच अमित मोहिते,रामाशेठ म्हात्रे ,सह ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी रोहा तहसीलदार यांना निवेदन दिले व यासाठी मागणी केली आहे. सदरच्या निवेदनात ग्रामपंचायत वरचे हद्दीतील मौजे वरसे निवी भुवनेश्वर गावांची साधारणपणे लोकसंख्या 20000 आहे तरी दररोजचा कचरा एक ते दीड टन पेक्षा जास्त कचरा निघतो कचरा घंटागाडीमार्फत...