
कालव्याच्या पाणी प्रश्न आंदोलन 'अल्टीमेटम'ची प्रशासनाने घेतली दखल, पाणी प्रश्न सुटणार की पाणी पेटणार? जिल्ह्यात चर्चा! ग्रामस्थांचे निवेदन तातडीच्या बैठकांवर बैठका! खांब (नंदकुमार कळमकर) कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी किल्ला ते निवी विभाग कालव्याला आठदहा वर्ष पाणी सोडत नसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल झालेत. उन्हाळ्यात पाण्याची भीषणता जाणवत आहे. भात, भाजीपाला, पूरक शेतीला पाणी नाही. गुरढोरे, पशु पाण्यासाठी ऐन तडफडत असतात. गावे दुष्काळाने होरपळून गेलीत. दुसरीकडे पाटबंधारेचे पाणी तालुका बाहेरील कंपन्यांना विकले जाते. धनधांडग्यांच्या राफ्टींगला सोडले जाते. हा राग ग्रामस्थांत असतानाच विभागातील बळीराजाला पाणी नाही म्हणून वाशी , लांढर, बोरघर, तळाघर, निवी हद्दीतील शेतीकरी, ग्रामस्थ पाण्यासाठी आक्रमक झाले. रविवारी समन्वय समितीच्या बैठकीत ग्रामस्थ पाण्यासाठी प्रचंड संतप्त झाले. येत्या पंधरा दिवसात संबंधीत प्रशासनाने पाणी सोडण्याबाबत लेखी आश्वासन न दिल्यास मोठे आंदोलन उभे करू याच ग्रामस्थांच्या अल्टिमेटचा अखेर सर्वच प्रशासनाने दखल घेतली. बुधवारी कालव्याच्या पाण्याबाबत तहसीलदार रोहा, ...