
रोजगारासाठी मुंबईला न जाता गावातच रोजगार निर्माण करणारे महत्त्वकांक्षी व्यक्तिमत्व:- चंद्रकांत खेडेकर माणगाव (प्रतिनिधी) आज रोजगार हा गंभीर आणि प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा प्रश्न बनला आहे गावात रोजगार नसल्याने गावच्या गाव ओस पडू लागलेआहेत. लोक रोजगारासाठी शहराकडे वळायला लागले आहेत मात्र याला अपवाद आहेत रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील मांजरोने विभागातील वडघर परिसरातील वडाचीवाडी या गावातील चंद्रकांत गणपत खेडेकर आहेत. चंद्रकांत खेडेकर हे 40वर्षीय तरुण मुंबईला न जाता आपल्या गावातच रस्त्याच्या बाजूला चंदू वडापाव नावाचे हॉटेल चालू केले या हॉटेलमध्ये वडापाव, पॅटीस,मंचुरियन,मिसळ,भेळ,यांना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असून चंद्रकांत खेडेकर यांच्या व्हेजिटेबल सुपला मोठ्या प्रमाणात मागणी असून हे सूप पिण्यासाठी माणगाव तालुक्यात तसेच साई, गोरेगाव, मोर्बा, दहीवली, मांजरोने चांदोरे नांदवी पुरार, म्हसळा, येथील अनेक खवय्ये सुप पीण्यासाठी येत असतात. ते सीझन पाहून सुद्धा व्यवसाय करता ते म्हणतात" शेतात काय पिकते व बाजारात काय विकते याला महत्त्व अस...