
महाड तालुक्यातील जुई गावातील दुर्घटनेत दिवंगत बांधवाना आदरांजली गोवे-कोलाड (विश्वास निकम) २५ जुलै २००५ रोजी मुसळधार पावसामुळे दरड कोसळून देशाच्या इतिहासात नोंद झालेल्या घटनेमुळे जी ९४ निष्पाप लोक डोंगराच्या कुशीत मृत्युमुखी पडली. त्या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी २५जुलै रोजी, मौजे जुई ग्रामस्थ श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करतात यावेळी देखील कार्यक्रम आयोजित केला गेला होता. या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून प्रमुख अतिथी म्हणून महाडचे तहसिलदार सन्माननीय सुरेशजी काशीद यानी उपस्थित राहून स्मारकाचे पूजन करून स्मारकास अभिवादन केले. त्यांच्या समवेत तुडील महसूल विभागाचे मंडळ अधिकारी वावेकर, जुई गावाचे सजाचे तलाठी भोसले, चिंभावे सजा तलाठी सुपेकर, प्रमुख सत्कार मूर्ती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गंगाधर साळवी सर, ग्रामपंचायत सरपंच मिनाज करबेलकर , ऍड राजेश देवळे, ग्रामस्थ अध्यक्ष प्रकाश देवळे, गजानन दवंडे, सूर्यकांत दवंडे, अरविंद घरटकर, अश्विनी घरटकर,जावेद दुस्ते, इनायत करबेलकर, महमदअली करब...