
अपेक्षा,लोभ सांडून भक्ती केली तर ती भक्ती यशापर्यंत नेते :- ह.भ.प. रामदास महाराज पाटील गोवे-कोलाड (विश्वास निकम) सर्व प्राणी मात्रात माणूस हा असंतुष्ट प्राणी आहे.फक्त बोलायला आहे.समाधान सोडून बोला, वाढलेल्या अपेक्षा, वाढलेला लोभ, यामुळे तो यशापर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे जर अपेक्षा,लोभ,सांडून भक्ती केली केली तरच ती भक्ती यशापर्यंत नेते असे मत रायगड भूषण ह.भ.प. रामदास महाराज पाटील यांनी वागणी येथील कार्यक्रमात व्यक्त केले. भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग l पावलो हे सांग सुख याचे ll१ll आंम्हा जाले धरिता यांचा संग l पळाले उद्वेग सांडूनिया ll२ll तुका म्हणे सुख बहू जाले जिवा l पडली या सेवा विठोबाची ll३ll या जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या आधारे रोहा तालुक्यातील रायगड भूषण ह.भ.प दळवी महाराज गुरुजी यांच्या अमृतमोहोत्सवा कार्यक्रमा निमित्त आयोजित किर्तनरुपी सेवेतून ते प्रबोधन करत होते . ३७३ वर्षापूर्वीचा काल त्या काळात प्रबोधन संत तुकाराम महाराज यांचे होते. तर प्रशासन शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे होते.तेव्हा समृद्धी कारण...