भगतगिरी पुन्हा सुरू बालसई येथून बुवा पळाले! खांब येथे बस्तान बसविले खांब येथे कालव्याच्या बाजूला भगतगिरीचा अड्डा, अंधश्रद्धेने गुरफटलेल्या लोकांची होतेय लुटमार! गुरूवारी भगतगिरीचा दरबार भरणार! अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली कुठे? झोपली कि, झोपेचे सोंग घेतले!जनतेचा सवाल? रोहा (समीर बामुगडे) लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारची भिती दाखवून भगतगिरी द्वारे त्यांची संकटातून सुटका करण्याचे आमीष दाखवून भोंदू बाबांनी त्यांची आर्थिक लुबाडणूक सुरू ठेवली होती. आधी ही भगतगिरी नागोठणे परिसरातील बालसई येथे सुरू होती. त्यानंतर प्रसारमाध्यमांना याबाबत जोरदार आवाज उठविल्यामुळे येथील भोंदूबुवांची बालसईमधून पळापळ झाली. त्यानंतर भगतगिरीचा धंदा पुन्हा खांब येथे सुरू झालेला आहे. येथे लोकांचा अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्याकडून ५०० रूपये घेतले जातात आणि एखाद्या समस्येवर भगतगिरीद्वारे तोडगा काढण्यासाठी ५ ते १० हजार आणि एखादा 'श्रीमंत बकरा' सापडल्यास ५० हजारांची मागणी करून लोकांची लुबाडणूक केली जात आहे. सध्या रोहा तालुक्यातील खांब येथे भगतगिरीचे ...
Posts
Showing posts from November, 2021
- Get link
- X
- Other Apps
रोहा भालगाव पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसचा झंझावात! अनेक ग्रामस्थांनी केला पक्षप्रवेश! कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यात आगामी पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भालगाव विभागात सुरू असलेल्या घडामोडींकडे संपूर्ण रोहा तालुक्याचे लक्ष लागले आहे.भालगाव विभागातील विकासकामे, दलित-आदिवासींचे प्रश्न फक्त राष्ट्रवादी काँग्रेस सोडवू शकतो असा संदेश समाजातील सर्व घटकांपर्यत पोहचला आहे.त्यामुळेच दुर्गम भालगाव पंचायत समिती गणामध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.त्याचीच परिणिती म्हणून भालगाव विभागातील अनेक ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. रोहा तालुक्यातील भालगाव ग्रामपंचायत हद्दितील कांडणे खुर्द बौद्धवाडी या गावातील शेकाप,शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.कांडणे खुर्द बौद्धवाडी गावातील विकास कामे ठप्प झाली होती.दलितांचे रखडलेले प्रश्न मार्गी लावायचे होते ,विकास कामांना गती देणार कोण?असे प्रश्न असताना ग्रामस्थांनी राष्ट्रवादी पक्षावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश...
- Get link
- X
- Other Apps
पुई पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेला महिसदरा पुलावरील रस्त्याला जीवघेणे खड्डे! प्रशासन पाहतोय कोणाच्यातरी मृत्यूची वाट ? गोवे-कोलाड (विश्वास निकम ) पुई पेट्रोल पंपाच्या बाजूला छोटासा पूल आहे. या पुलाच्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे असून हे जीवघेणे खड्डे अत्यंत धोकादायक असल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांच्या जीवाशी खेळणारे खड्डे असल्यामुळे वाहनचालकांना जीव वाचवून तेथून मार्ग काढावा लागत असल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला असून प्रशासन कोणाच्या तरी मृत्यूची वाट तर पाहत नाही अशी खंत राष्ट्रीय छावा संघटना दक्षिण रायगड कार्याध्यक्ष तथा समाजसेवक निलेशभाई महाडीक यांनी पत्रकारांशी व्यक्त केली. खड्ड्यांच्या याबाबतीत रायगड जिल्हा अग्रेसर आहे. वास्तविक मुंबई गोवा महामार्गावर असलेले हे खड्डे बळी घेण्याची वाट पाहत आहेत काय ? असा ज्वलंत प्रश्न नागरिकांना पडला आहे. पुई येथील समाजसेवक श्री. निलेशभाई महाडिक यांनी पत्रकारांना सांगितले मुंबई महामार्गावरील हे रस्ते आहेत की खड्ड्यातील रस्ते असा ज्व...
- Get link
- X
- Other Apps
आळंदी अलंकापुरीत लोटला भाविकांचा जनसागर ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात अनेक पायी दिंड्यां अलंकापुरीत दाखल, प्रशासकीय यंत्रणा सज्ज! आळंदी (श्याम लोखंडे) ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पुज्यस्थानी, चिंताकांचा चिंतामणी, ज्ञानोबा माझा...' असे म्हणत खांद्यावरिल भगव्या पताका उंचावत वैष्णवांची मांदियाळी गेली काळ पासून आळंदी आलंकापुरित मावऊलींच्या संजीवन समाधी दिन पायी दिंडी सह भाविक लाखोंच्या संख्येने या समाधि सोहळ्यासाठी आळंदीत दाखल होत असून कार्तिकी एकादशी निमित्ताने लाखो भाविकांच्या वतीने मोट्या भक्ती भावाने माऊलीला प्रदक्षिणा व संजवणी समाधी सोहळ्याकरीत या ठिकाणी स्थानिक पालिका यंत्रणेसह आरोग्य व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. मागील दोन वर्षे कोरोना संसर्गामुळे शासकीय निर्बंध असल्याने लाखो वारकरी भक्तगणांच्या वारीत खंड पडले मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेला श्री क्षेत्र आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा शासनाच्या अटी शर्ती नुसार संपन्न होत असलेल्या समाधी सोहळ्याकरिता रविवारी 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी उशिरा पर्यंत ...
- Get link
- X
- Other Apps
रायगड जिल्हास्तरीय राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद संपन्न! नागोठणे (टिळक खाडे) भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद या वैज्ञानिक उपक्रमाचे आयोजन दरवर्षी केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा , त्यांच्यामध्ये संशोधक वृत्ती वाढीस लागावी , त्यांना सर्वेक्षण पद्धतीचे आकलन होऊन त्यांच्यामध्ये जिज्ञासा , निरिक्षण, तर्कसंगत विचार हे गुण वृद्धींगत व्हावेत ह्या उद्देशाने ह्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन केले जाते . ' शाश्वत विकासासाठी सामाजिक नाविन्य ' हा यावर्षीच्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचा मुख्य विषय आहे. रायगड जिल्ह्यातील विविध शाळांतील ३०० विद्यार्थ्यांनी ह्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी आपल्या प्रकल्पांची नोंदणी केली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ह्यातील निवडक ८० प्रकल्पांचे दिनांक १८ व १९ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय ऑनलाईन सादरीकरण झाले . या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नवी मुंबई येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जिओमॅग्नेटिझम या संस्थेतील वरिष्ठ व...
- Get link
- X
- Other Apps
कोलाड नाक्यावरील वाघमारे गुळाचा चहाला अनेकांची पसंती! सुतारवाडी (हरिश्चंद्र महाडिक) कोलाड नाक्यावर गुळाच्या चहाला चांगली मागणी असून वाघमारे यांनी सुरू केलेला या गुळाच्या चहाची चव लज्जतदार असून याचे फायदे ही चांगले आहेत. क्षण आनंदाचा आणि चहा गुळाचा हे सांगताना वाघमारे यांनी सांगितले की, या गुळाच्या चहाचे अनेक फायदे आहेत. गुळामध्ये आयर्न, पोटॅशिअम असल्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. गुळ हे अॅन्टीटॉक्सीन म्हणून काम करते. तसेच शरीरातील हानिकारक टॉक्सीन बाहेर काढून त्वचा चमकदार बनविण्यास मदत होते. गुळाच्या चहामुळे उतार वयातील समस्या दूर होण्यास मदत होते. संधी वातावर अत्यंत गुणकारी आहे. पचन क्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच थकवा दूर होतो. गुळामध्ये शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवणारे घटक अधिक प्रमाणावर असतात. केसांविषयी आणि त्वचेविषयी समस्या दूर होण्यास उपयुक्त आहे. चवी बरोबर हा आरोग्यदायी चहा गुणकारी असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. छायाचित्र:- हरिश्चंद्र महाडिक सुतारवाडी
- Get link
- X
- Other Apps
तळा येथे राष्ट्रीय पिछड़ा वर्ग (ओ.बी.सी.)मोर्चा संपन्न तळा (कृष्णा भोसले) तळा तालुक्यात राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी)मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११वाजता नागरिक यासाठी मोठ्या संख्येने जमा झाले होते. तळा तळेगाव रोड मार्गे हा मोर्चा निघाला शहरात बळीचा नाका येथे मोर्चा चे वतीने जितेंद्र भोसले यांनी उपस्थीत नागरिकांना मार्गदर्शन केले.त्यांनी कृषी कायदे विषयक माहिती दिली, ओबीसी चीं जातीनिहाय जनगणना, केंद्र सरकार व्दारा जाती आधारीत जनगणना आणि ओबीसींची जातिआधारीत जन-गणना करण्यास नकार दिल्याबद्दल, तीन कृषी कायदे आणि ईव्हीएमच्या विरोधात.. राष्ट्रीय ओबीसी (पिछडा-वर्ग) मोर्चाद्वारे टप्प्याटप्प्याने देशव्यापी चरणबद्ध आंदोलन खालील प्रमाने केले जात आहे. तरी या मोर्चामध्ये ओबीसी मधील संघटनांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी बांधवांनी एकत्र येऊन या राष्ट्रव्यापी संघटनेच्या सोबत एकत्र येऊन लढत आहोत. चौथा टप्पा२५ नोव्हेंबर २०२१ भारतातील ३१ राज्यांच्या ५५० जिल्ह्यांमध्ये ५,००० तालुक्यात होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून तळा तहसीलमध्ये सकाळी १२वाजता रॅली प्रदर्शन ...
- Get link
- X
- Other Apps
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्ताने कोलाड येथील पत्रकारांचे समाजसेवक निलेशभाई महाडिक यांनी केला सन्मान! कोलाड ( विशेष प्रतिनिधी ) पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजाचा आरसा आहे समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट सर्व बाबींचे निरीक्षण करून तो वृत्तांकन करुन तो आपली जबाबदारी आपले कर्तव्य पार पाडत असतो पत्रकारांच्या कर्तव्याला आपण ही साथ दिली तर पत्रकारांच्या लेखणीला अधिक ताकद येईल अधिक गती येऊन पत्रकार अधिक निर्भीड होतील यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून कोलाड पुई या गावातील समाजसेवक तसेच राष्ट्रीय छावा संघटना दक्षिण रायगड कार्याध्यक्ष नीलेशभाई महाडिक यांनी राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून कोलाड परिसरातील पत्रकारांचा 25 नोव्हेंबर रोजी त्यांच्या पुई या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात पत्रकार बांधवांना शाल सन्मान प्रतिमा व पुष्प गुच्छ देत सन्मानित केले. यावेळी सुतारवाडी येथील ज्येष्ठ पत्रकार हरिचंद्र महाडिक खांब कोलाड विभागीय पत्रकार रायगड भूषण डॉ श्याम लोखंडे, गोवे कोलाड येथील पत्रकार विश्वास निकम चिंचवली कोलाड येथील पत्रकार भिवा पवार यांचा शाल श्रीफळ व...
- Get link
- X
- Other Apps
रा.जि.प.शाळा विहुले कोंड येथे विदयार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप! माणगाव (प्रतिनिधी) रा. जि.प.शाळा विहूले कोंड ता. माणगाव येथे शुक्रवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी UNISEF ,CACR Foundation Mumbai व हरित ग्राम सेवा संस्था महाड यांच्या सहकार्याने इ.१ली ते ७ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या परिसरातील रा. जि. प. शाळा विहुले कोंड, डोंगरोली वरची वाडी , डोंगरोली खालची वाडी, बौद्ध वाडी, विहूले , महादपोली, व महादपोली आदीवासीवाडी, या शाळेतील १५४ विद्यार्थ्यांना शालेय दफ्तर व विविध प्रकारच्या अनेक खेळाचे साहित्य श्री विनोद लाड सर ( अभिनव ज्ञान मंदिर उसर खर्द) यांच्या विशेष प्रयत्नातून व श्री राजेन्द्र कडू सर अध्यक्ष हरित ग्राम सेवा संस्था श्री सुशिल कदम सर यांच्या सहकार्याने वाटप करण्यात आले.यावेळी CACR चे श्री नितीन वाढवाणी सर , सौ पालकर मॅडम गटशिक्षणाधिकारी माणगाव तालुका, श्री सुजित शिंदे सभापती माणगाव, श्री शैलेश भोनकर सदस्य पंचायत समिती, श्री गजानन अधिकारी माजी सभापती माणगाव , श्री सावंत सरपंच विहुले कोंड , श्री विश्वास मौले सर्व मुख्याध्यापक , शिक्षक , पालक उपस्थित होते....
- Get link
- X
- Other Apps
पार्वतीबाई महादेव नांदगावकर यांचे देहावसान! कै. पार्वतीबाई महादेव नांदगावकर तळा( कृष्णा भोसले) तळा तालुक्यातील रोहीदास वाडी येथील सर्वांच्या लाडक्या बय पार्वतीबाई महादेव नांदगावकर यांचे गुरू.दि.२५ रोजी रात्री ११वाजता देहावसान झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ९१ वर्ष होते.त्याच्यां पाठीमागे १मुलगा, २मुली ,सुना , नाती,नातवंडे,पंतवडे असा फार मोठा परिवार आहे.त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच अनेकांनी त्यांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेतले.त्याच्यां अत्यंयात्रेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेचआप्तवर्ग,इष्टमित्र, परिवार, यांनी सहभाग घेतला. त्यांचे दशविधि क्रिया शनिवार दि.४/१२/२०२१ रोजी तर बारावे उत्तर कार्य सोमवार दि.६/१२/२०२१ रोजीतळा येथे त्यांच्या रहात्या घरी होणार आहेत.
- Get link
- X
- Other Apps
गरिबांची लालपरी संपानंतर रोहा आगारातून अखेर धावली सामान्य प्रवाशांत समाधान! कोलाड ( श्याम लोखंडे) एस .टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे ही कामगारांची प्रमुख मागणी व इतर मागण्यांसाठी दि. 8 नोव्हेंबरपासून एस. टी. कर्मचाऱ्यांनी संपाच्या माध्यमातून आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाचा तोडगा निघाला नसला तरी शासनाने केलेल्या आव्हानाला काही कर्मचारी वर्ग यांनी प्रतिसाद देत रोहा आगारातून शुक्रवार दि. 26 नोव्हे.रोजी सकाळी 11 वा.पासून रोहा तालुक्यातील ग्रामीण भागात लालपरी एस.टी. सेवा सुरु करण्यात आली असल्याची माहिती आगार प्रमुख सोनाली कांबळे यांनी दिली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात एस.टी सेवा सुरु झाल्याने समान्य प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.रोहा आगारात एकुण 244 कर्मचारी असून त्यातील आतापर्यंत 25 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. शुक्रवारपासून रोहा तालुक्यातील विरझोली , नागोठणे, चणेरा, कोलाड अशा फ़ेऱ्यांना सुरुवात झाली असून एस.टीच्या सायंकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत एकून 56 फ़ेऱ्या झाल्या आहेत. सदर एस.टी.वाहतूक सेवा रोहा आगारप्रमुख सोनाली कांबळे या...
- Get link
- X
- Other Apps
शिष्यवृत्ती परीक्षेत वडघर हायस्कूलचे सुयश! भूमी धुमाळ व श्रुष्टी पवार शिष्यवृत्ती प्राप्त! सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव! माणगाव(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ पुणे यांनी 12 ऑगस्ट रोजी घेतलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित सरस्वती विदया मंदिर वडघर मुद्रे,ता.माणगाव ,जिल्हा- रायगड तथा कै.शंकर सिताराम विदया संकुलच्या कु.भूमी हरिश्चंद्र धुमाळ व कु.श्रुष्टी भिवा पवार या दोन विदयार्थ्यांनींनी शिष्यवती प्राप्त केली आहे . शाळेतून एकूण ८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी दोन विद्यार्थ्यांनी यशस्वी झाल्या आहेत. या घवघवीत यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अंजली धारसे,शाळा समिती अध्यक्ष मा.श्री.महादेव जाधव, सदस्य विजय सावंत यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांनी अत्यंत हुशार, चाणाक्ष, जिज्ञासू, आज्ञाधारक,प्रामाणिक, उत्तम वक्तृत्व शैली अशा असंख्य गुणांनी परिपूर्ण आहेत. या दोन्ही विद्यार्थ्यांनींचे मांजरवणे पंचक्रोशी व संपूर्ण तालुक्यातून शिक्षण प्रेमींकडून अभिनंदन...
- Get link
- X
- Other Apps
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मागासवर्गीय वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी आवाहन! मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह बोरघर हवेली येथे २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात प्रवेशाबाबत! तळा ( कृष्णा भोसले ) कोरोना काळानंतर शासनाचे आदेशानुसार महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय विभागाचे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह हे बोरघर हवेली तालुका क्रीडा संकुलाजवळ ता.तळा जिल्हा.रायगड या वसतिगृहात सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.तरी मागासवर्गीय मुलांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन एस.एफ.कदम .गृहपाल यांनी केले आहे. सदरच्या वसतिगृहाची मान्य संख्यां १००असुन या वसतीगृहात इयत्ता ८वी पासुन प्रवर्ग निहाय अनु.जाती ८०टक्के,अनु.जमाती ३टकके, विमुक्त भटक्या जाती, ५टक्के, आर्थिक व इतर मागासवर्गीय दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थी ३टक्के, विशेष मागास प्रवर्ग २टक्के, अनाथ २टक्के, अपंग ३टक्के , सदर वसतिगृहात गुणवत्ता नुसार प्रवेश दिला जाणार आहे.विदयार्थाकरिता मोफत निवास व्यवस्था,नाष्टा व भोजनाची मोफत व्यवस्था केली जाणार आहे. दररोज सकाळी पोहे,शिरा,...
- Get link
- X
- Other Apps
चला आळंदीला जाऊ!ज्ञानेश्वर डोळा पाहू! ग्यानबा तुकोबांच्या गजरात संभे कोलाड येथून पायी दिंडीचे आळंदीकडे प्रस्थान, , अलंकापुरीत होतील संतांच्या भेटी! कोलाड (श्याम लोखंडे) देव धर्म समाज मानवता यांची नीती मूल्यांची जोपासना जाणारे म्हणजे भारतीय संस्कृतीतिल वारकरी संप्रादय ,मार्ग दाऊनीया गेले आधी l दयानिधी संत ते ll तेणेचि पंथे चालो जाता l न पडे गुंथा कोठे काही ll कोकणचे श्रद्धास्थान स्वा.सुख निवासी गुरुवर्य अलिबागकर महाराज यांच्या प्रेरणेने गुरुवर्य गोपालबाबा वाजे यांच्या कृपा आशीर्वादाने रायगड भूषण ह.भ.प. नारायण तात्या (आण्णा) दहिंबेकर, आणि नारायण बाजी महाबळे यांच्या संकल्पनाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज सत्संग वारकरी सेवा मंडळ संभे कोलाड यांच्या कार्य प्रणालीने सुरु असलेला दिंडी सोहळा सन 2000 सालापासून अविरत पायी दिंडी सोहळा ह्या सोहळ्याच्या माध्यमातून रोहा तालुक्यातील अनेक भाविक मंडळी व वारकरी एकत्रित येऊन चांगल्या विचारांची देवाण घेवाण करून एक आनंद निर्माण देतो, समाज्यात वावरण्यासाठी उपयोगी असे आपल्याला देह धर्माशी निगडित राहून (तस्मोमा जोतिदेर्ग्मये) अखंड नामस्मरणाच्या व कीर्तन प्रवच...
- Get link
- X
- Other Apps
सोनसडे येथे मोफत सातबारा उतारा वाटप तळा (कृष्णा भोसले) भारताच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना शेतकरी बांधवांना मोफत सातबारा उतारा वाटप करण्यात आला. तलाठी सजा सोनसडे येथे शासनाच्या आदेशानुसार जवळपास १०० शेतकरी बांधवांना सातबारा चे वाटप करण्यात आले.यावेळी गावचे अध्यक्ष भागोजी भोसले, उपाध्यक्ष नामदेव भोसले सचिव रमेश कदम , व गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांना आपल्या गावात शेतीचा सातबारा उतारा घरपोच मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.महीला पुरुष यांनी या स्वत यांचा लाभघेत आपल्या जमिनिची माहिती घेतली.आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शासनाने शेतकरी बंधू भगिनी यांना हे डिजिटल सहिचे सातबारा उतारे मोफत देण्यात आले.
- Get link
- X
- Other Apps
तळा तालुका पत्रकार संघाची नव्याने स्थापना! अध्यक्षपदी कृष्णा भोसले तर सचिव पदी श्रीकांत नांदगावकर यांची निवड, सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव! तळा (कृष्णा भोसले) तळा तालुक्यात तळा तालुका पत्रकार संघाची नव्याने स्थापना करण्यात आली आहे.. या संघटनेच्या अध्यक्षपदी पत्रकार कृष्णा भोसले तर सचिवपदी श्रीकांत नांदगावकर तर कार्याध्यक्षपदी पत्रकार संध्या पिंगळे, तर सदस्य म्हणून संतोष जाधव व सुरज पुरारकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सोनसडे येथील कालभैरव सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न, गोरगरीब डोंगरदाऱ्यात राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या समस्या, याबाबत वाचा फोडणे, शासकीय स्तरावर नागरीकांची कामे वेळेत व्हावीत.यासाठी लक्ष केंद्रित करणे.तालुक्यात सामाजिक उपक्रम राबविणे, संघटनेचे पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन एकमेकांत संवाद साधत संघटनेला बळकटी देणे याविषयावर भर देण्यात आला.याचबरोबर विविध छोटे-मोठे उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करणे.अशा विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष कृष्णा भोसले यांनी मार्गदर्शन...
- Get link
- X
- Other Apps
अवकाळी पावसामुळे कडधान्य पिकाला धोक्याची घंटा! शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, जनजीवनावर परिणाम! कोलाड (श्याम लोखंडे ) बळीराजाच्या नशिबी सुगीचे दिवस नाहीच या ना त्या कारणाने बळीराजा कायम ग्रासला आहे. त्याच्यावर अनेक प्रकारचे संकट येत असतात जात असतात मात्र तो कधीच खचून जात नाही संपूर्ण जगाचा पोशिंदा समजला जातो सर्वांचीच भूक भागवण्याचे काम कवाड कष्ट करत तो भागवत असतो मागील दोन वर्षे त्याच्यावर अनेक संकट त्यातच गेल्या पाच ते सहा दिवसापासून ढगाळ वातावरणानंतर तसेच दुपार नंतर पडत असलेल्या धुवांधार अवकाळी पावसामुळे रोहा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातच त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. असून शेतकरी-बागायतदारांच्या चिंतेत प्रचंड वाढ झाली आहे.रोहा तालुक्यात खरिपाच्या पिकानंतर शेतकरी कडधान्य व भाजीपाला पीक घेतात परंतु शेतात पाणी साचून राहिल्याने या पिकांना आता धोक्याची घंटा सुरू झाल्याने अनेक शेतकऱ्यांना चिंतेचे ग्रहण लागले असून अधिक कसरत करावी लागत आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाज पूर्वसूचनेनुसार दिनांक१७ ते २१ नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये व ...
- Get link
- X
- Other Apps
जय शिवराय क्रिकेट चषकाचे मानकरी लक्ष्मीनगर गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील जय शिवराय क्रिकेट असोशियन च्या वतीने लक्ष्मीनगर येथे आयोजित मर्यादित क्रिकेट सामन्यात जय शिवराय चषक प्रथम क्रमांक लक्ष्मीनगर या संघाने पटकावला आहे. विजेते संघाला रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे. या स्पर्धेला आमदार अनिकेत तटकरे यांनी भेट दिली असून विजेते संघाला राष्ट्रवादी अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे, शेणवई सरपंच प्रगती देशमुख, उद्योजक संतोष भोईर, महादेव सरसंबे,परेश म्हात्रे, चंद्रकांत चौलकर, दत्ता चावरेकर, संजय दाभाडे, मंगेश दाभाडे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आले असून यावेळी अंकुश ताडकर, रमाकांत चौलकर, गणेश चावरेकर, दत्ता वाघमारे, मनोज मोरे, भूषण टक्के, विवेक चावरेकर, प्रवीण दाभाडे आदी उपस्थित होते या स्पर्धेत द्वितीय क्रमांक सानेगाव, तृतीय क्रमांक शेणवई, चतुर्थ क्रमांक यशवंतखार, उत्कृष्ट गोलंदाज निषेध दाभाडे, उत्कृष्ट फलंदाज सागर भोस्तेकर मालिकावीर स्मितेज दाभाडे यांना देण्यात आले.
- Get link
- X
- Other Apps
संजय थळे यांना वसंत स्मृती पुरस्कार प्रदान, सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव, गोवे-कोलाड (विश्वास निकम ) भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभाग यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा स्वर्गीय वसंत डावखरे यांच्या स्मरणार्थ वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार श्री. संजय थळे प्राथमिक शाळा अडुळसे यांना सम्मान पूर्वक प्रदान करण्यात आला. रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हयांतील शिक्षकांची ऑफलाईन पद्धतीने या पुरस्कारासाठी माहिती मागविण्यात आली होती. संजय थळे यांनी आजतगायत आपल्या शाळेत अनेक शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास केला आहे. त्यांच्या उपक्रमांची दखल अनेक संस्थांनी घेवून त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित ही केले आहे. वसंत स्मृती पुरस्कार खासदार श्री. कपिल पाटील, आमदार संजय केळकर, आमदार श्री. विनय नातू, मा. आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते अनेक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान कण्यात आला. त्यांच्या या यशात अडुळसे ग्रामस्थ त्याचप्रमाणे गटशिक्षणाधिकारी ...
- Get link
- X
- Other Apps
रोहा पंचायत समितीचा कारभार आहे तरी कसा? भ्रष्टाचार ग्रामपंचायतींवर कारवाई सोडाच, मात्र चौकशी देखील होत नसल्याने संताप! कुंपण तर शेत खात नाही ना? जनतेत चर्चा...... कोलाड ( श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यात कोरोना काळात अनेक ग्राम पंचायत मध्ये झालेले भ्रष्टाचार आता सर्व सामान्य जनतेसमोर उघड होत चालले आहेत मात्र त्यावर काम करणारी प्रशाकीय यंत्रणा मात्र डोळेझाक करत असल्याने कारवाही सोडाच मात्र त्यावर साधी चौकशी करण्यास टाळाटाळ त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे , रोहा तालुक्यातील श्रीमंत समजली जाणारी ऐनघर ग्राम पंचायत पाठोपाठ आता पुन्हा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी,भातसई, तांबडी सह काही ग्राम पंचायतीत अनागोंदी कारभारातून गैर व्यवहार झाले आहेत त्यामुळे हे निदर्शनात येताच स्थानिक काही ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी या बाबत वेळोवेळी संबंधित अधिकारी वर्गांकडे याच्या लेखी तक्रारी करून देखील त्यावर कारवाही सोडाच मात्र साधी त्याची चौकशी देखील करण्यास टाळाटाळ करत असल्याने सर्व सामान्य जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. """ सरकारी काम आणि बारा...
- Get link
- X
- Other Apps
खांब पालदाड मार्गावर अपघातांची मालिका सुरूच,एकाच दिवशी तीन विचित्र अपघात एक महिला गंभीर जखमी कोलाड (श्याम लोखंडे ) मुबंई गोवा महामार्गाला जोडला गेलेला उपरस्ता म्हणजे खांब देवकान्हे पालदाड मार्ग या मार्गावर भयानक पडलेले खड्डे आणि भयानक वाढलेले काटेरी झुडपे धोकादायक असलेले वळणे यामुळे आता पुन्हा प्रवाशी नागरिकांच्या जीवावर वेतली असून काळ परवा एकाच दिवशी या मार्गावर भयानक तीन विचित्र अपघात घडले असून यात एक महिला अती गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर सुदैवाने या अपघातात एक लहान मुलगी सुखरूप बचावलेचे सर्वत्र बोलले जात आहे, या विषयी सविस्तर माहिती अशी की खांब पालदाड मार्ग हा दिवसंदिवस धोकादायक बनत आहे असे अनेकदा भाकीत केले होते या मार्गावर भयानक पडलेले खड्डे तसेच धोकादायक वळणे मार्गालगत वाढलेली मोठं मोठी काटेरी झुडपे यामुळे नेहमीच लहानसहान आपघात होतात परंतु मागील दोन दिवसांपूर्वी या मार्गावरील देवकान्हे पालदाड दरम्यान एकाच दिवशी वाहने समोरासमोर धडकल्याने दोन आपघात घडले तर एक छकडा बैल गाडी व टुव्हीलर अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली तर दैव बलवत्तर म्हणून एक लहान मुलगी ...
- Get link
- X
- Other Apps
उस्मानाबाद येथील सराईत भामट्याने कोलाड जवळील सुतारवाडीत येऊन 3 लाख ६२ हजार रुपयांना गंडा घालून फरार झाला गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोलाड जवळील सुतार वाडी नाक्यावर एक भामटा आला, काही दिवस तेथे वास्तव्य केले अनेकांना आपल्या गोडवाणीने आपल्या जाळ्यात अडकविले आणि लाखो रुपये तसेच किराणा माल घेवून कोणासही थांगपत्ता न लागता या सराईत भामट्याने दूसरे ठिकाण गाठल्याने या ठिकाणी चर्चेचा विषय झाला आहे. याबाबत अज्ञात इसमाबाबत संबंधितांनी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी सुतारवाडी नाक्यावर एक व्यक्ती काही दिवसांपूर्वी भाड्याने खोली घेवुन वास्तव्य करत होती. तेथे वास्तव्यास आल्यानंतर त्याने अधिक विश्वास संपादन करण्यासाठी सुतारवाडी येथे सत्यनारायणाची पुजा घालून पूजेसाठी अनेकांना निमंत्रण ही दिले होते. त्यावेळी त्यांने अनेकांची मने जिंकली आणि भूलथापाना अनेकांना आपल्या जाळ्यात अडकविले मी पुणे जिल्हयाचा सर्वेक्षण अधिकारी आहे. रायगड जिल्हयात दोन लेखनिका...
- Get link
- X
- Other Apps
शिक्षिका श्रीमती वरूणाक्षी भारती आंद्रे यांना शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांच्या हस्ते महाशिक्षक पुरस्कार प्रदान गोवे-कोलाड (विश्वास निकम ) पालघर जिल्हा परिषदेच्या आगवन शिशुपाडा शाळेतील सौ.वरूणाक्षी भारत आंद्रे यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते महाशिक्षक अॕवाॕर्ड नरिमन पाॕईंट मुंबई येथे प्रदान करण्यात आला. सी. आर. दळवी (I)आय फाउंडेशन नवी मुंबई महाराष्ट्र च्या वतीने हा पुरस्कार त्यांचे कोविड लाॕकडाऊन दरम्यान शैक्षणिक व सामाजिक उल्लेखनीय कामाच्या निवडीबद्दल देण्यात आला. लाॕकडाऊन काळात अनेक नाविण्यपुर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांचे अध्यापन निरंतर चालू ठेवले,अनेक सेवाभावी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य मिळवून दिले तसेच लाॕकडाऊन मध्ये त्यांनी केलेल्या 'स्मार्ट पाटी' ह्या नवोपक्रमाला राज्यभर उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे .आंद्रे यांना आता पर्यंत राष्ट्रीय ,राज्यस्तरिय,जिल्हा स्तरिय असे एकूण पाच नवोपक्रमशील पुरस्कार मिळाले आहेत. महाशिक्षक पुरस...
- Get link
- X
- Other Apps
रोहा नगरीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंताचे जंगी स्वागत गोवे-कोलाड (विश्वास निकम) माझदा हेलिपॅड रोहा येथे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा, श्री, उदयजी सामंत यांचे शनिवार दि.१३/११/२०२१ आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करताना मा, श्री, युवा नेते संदीपजी तटकरे साहेब चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव,श्री अजित तेलंगे, विपुल मसाल, विजय पाटील,प्राचार्य मुंडे तसेच स्वागत करताना महेंद्र शेठ दळवी यांच्या उपस्थित स्वागत करण्यात आले. यावेळी युवा नेते मा, श्री, संदीपजी तटकरे यांचे सहकारी प्रसाद खुळे, प्रशांत देशमुख, व निलेश भाई महाडीक हे ही उपस्थित राहून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
- Get link
- X
- Other Apps
समाजसेवक निलेश भाई महाडीक यांच्या तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप गोवे-कोलाड (विश्वास निकम) तामसोली येथील रा, जि, प,शाळा येथे कोलाड शहारातील युवा नेते व समाजसेवक निलेश भाई महाडीक यांच्या तर्फे सोमवार दि:१५/११/२०२१ रोजी शैक्षणिक उपक्रम राबवून तामसोली येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना वहया व पेन या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. . समाजसेवक निलेश भाई महाडीक हे शिक्षणा विषयी जनजागृती व समाज विकासासाठी मोलाचे कार्यकरीत आहेत तसेच त्यांनी समाजातील अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले आहे.त्यांच्या या कार्यामुळे त्यांना राज्यस्तरावरील समाजरत्न पुरस्काराने ही सन्मानित केले आहे. या वेळी समाजसेवक निलेशभाई महाडीक,प्रसाद खुळे, संजयदादा कनघरे, ईकिंदर शेवाले, गौरव नाईक,शाळेचे मुख्याध्यापक डाके सर यांच्या सह असंख्य मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
पंढरपूर मध्ये तुफान पाऊस, विठ्ठल भक्तांची तारांबळ, गोवे-कोलाड (विश्वास निकम ) पंढरपूर मध्ये दोन दिवसापासून पडत असलेल्या तुफान पावसामुळे विठ्ठल भक्तांची तारांबल उडाली असून विठ्ठल दर्शन घेण्यासाठी व्यत्यय आला आहे. कोरोनामुळे दोन वर्षापासुन सर्वत्र मंदिर बंद करण्यात आले होते परंतु दोन वर्षानंतर पंढरपूर मध्ये विठ्ठल मंदिर उघडून भाविकांना दर्शनासाठी परवानगी दिली. यामुळे यावर्षी विठ्ठल दर्शनासाठी वैष्णवांची गर्दी दिसून आली. परंतु दि.१३/११/२१ व १४/११/२१ रोजी पंढरपूर मध्ये दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे विठ्ठल भक्तांची तारांबळ उडाली असून बाजारपेठेत असणाऱ्या विविध प्रकारच्या व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. या वर्षी शासनाने विठ्ठल दर्शनासाठी परवानगी दिल्यामुळे पंढरपूर मध्ये प्रचंड गर्दी होईल अशीच परिस्थिती निर्माण झाली यामुळे येथील व्यावसायिकांनी विविध प्रकारचा मोठया प्रमाणात माल भरला परंतु एसटी कर्मचारी वर्गाने संप पुकारल्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी सर्वच भाविक...
- Get link
- X
- Other Apps
प्रा.आमलपुरे सूर्यकांत अवगत २०२१या पुरस्काराने सन्मानित गोवे-कोलाड(विश्वास निकम ) येथील डाॅ .श्री .नानासाहेब धर्माधिकारी काँलेज मधील हिंदी विषयाचे प्राध्यापक, हिंदी विभाग प्रमुख श्री. आमलपुरे सूर्यकांत यांना अक्षरवार्ता आंतरराष्ट्रीय शोधपत्रिका व कृष्ण बसंती शैक्षणिक व सामाजिक जनकल्याण समिती उजैन, मध्य प्रदेश येथून२०२१ या वर्षी चा अवगत सन्मान पुरस्कार देण्यात आला असून हा पुरस्कार त्यानी केलेल्या शोध कार्या साठी दिलेला आहे. गेली १२ वर्षा पासुन शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून ४०शोध निबंध प्रकाशित झाले असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ४०चर्चा सत्रात सहभागी झाले असून ३ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे. या यशाबाबत संस्थेचे सचिव संदीपजी तटकरे, सर्व पदाधिकारी, प्राचार्य शंकर मुंडे, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेततर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील कार्या साठी शुभेच्छा दिल्या.
- Get link
- X
- Other Apps
माय बाप सरकारची काय गाढवं मारली,की नशिबात बारा वर्षे नाकातोंडात धूळ,आंबेवाडी कोलाड,खांब,ग्रामस्थांचा संतप्त सवाल? कोलाड (श्याम लोखंडे) मुबंई गोवा महामार्ग चौपदरीकरनाचे काम गेली दहा ते बार वर्षे सुरू आहे त्यात पहिला टप्पा म्हणून पनवेल पलस्पे ते इंदापूर असा सत्तर ते ऐंशी कि.मि. अंतराच्या कामाला धडाकेबाज तात्कालीन सरकारने सुरुवात केली मात्र याला आता एक तप पूर्ण झाला त्यामुळे माय बाप सरकारा आमच्या हातून काय पाप घडले की त्याचे फलीत गेली बार वर्ष सदरच्या मार्गावरील आंबेवाडी कोलाड ,खांब,येथील रहीवासी नागरिकांच्या नशिबी कोणते भोग आले आहेत की त्यांना या जन्मी रस्त्यामार्गावरील वाहनांच्या वर्दळीमुळे प्रदूषित होत असलेली धूळ खावी लागत आहे त्यामुळे खांब कोलाड आंबेवाडी येथील नागरिकांकडून संताप जनक सवाल व्यक्त केला जात आहे . मुबंई गोवा महामार्गारील पेण, वडखळ,नागोठणे, वाकण, खांब,कोलाड आंबेवाडी नाका,वरसगाव,तळवली तिसे, सह इंदापूर पर्यंतच्या मार्गावर अक्षरशः धूळ प्रदूषित मार्ग बनला आहे महामार्गावरील हवेत प्रदूषित होत असलेली धूळ त्यात खड्डेमय प्रव...
- Get link
- X
- Other Apps
श्रीगुरु गोपाळबाबा वाजे अलिबागकर महाराज यांचा २९वा पुण्यस्मरण सोहळा, गोवे-कोलाड (विश्वास निकम) श्री सद्गुरू गणपतबाबा अलिबागकर महाराज यांच्या फडाचे वंशज वै. श्री. गुरु गोपाळबाबा वाजे अलिबागकर महाराज यांचा एकोणतीसावा (२९) वा.पुण्यस्मरण मिती कार्तिक वद्य ४ शके १९४३मंगळवार दि.२३/११/२०२१ रोजी श्री. अलिबागकर महाराज मठ, कासार घाट श्रीक्षेत्र पंढरपूर येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रम मिती कार्तिक वद्य १शके १९४३ शनिवार दि.२०/११/२१ते कार्तिक वद्य ५बुधवार दि.२४/११/२१पर्यंत साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमानिमित्ताने दैनंदिन कार्यक्रमात पहाटे ४ते ६श्रींची काकड आरती भजन, सकाळी ६.३० ते ८.३०नित्यपूजा,९ते १२.३० श्री. तुकोबाराय गाथा भजन, दुपारी १ते ४भोजन, सांय.४ते ५ प्रवचन,५ते ६.३०हरिपाठ,७ते ९ हरिकीर्तन, नंतर जागरण होईल. तसेच मिती कार्तिक वद्य ४शके १९४३मंगळवार दि.२३/११/२१रोजी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्...
- Get link
- X
- Other Apps
गोवे येथील सामाजिक कार्यकर्ते खेळू दहिंबेकर यांचे दुःखद निधन कै. खेळू दहींबेकर गोवे- कोलाड (विश्वास निकम) रोहा तालुक्यातील गोवे येथील रहिवासी खेळू हरि दहिंबेकर यांचे शुक्रवार दि.५/११/२०२१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय ५१ वर्षाचे होते.ते परोपकारी व प्रेमळ स्वभावाने सर्वाना परिचित होते. सामाजिक कार्यात ते नेहमी सक्रिय होते.त्यांना लहान व थोर मंडळी खेळू मामा या नावाने हाक मारीत असत.ते धाटाव येथील एफडीसी कंपनीत कायमस्वरूपी नोकरी करीत होते. त्यांच्या आकस्मित निधनामुळे त्यांच्या कुटूंबा वर दुःखाचे डोंगर पसरलेले आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी धाटाव येथील एफडीसी कंपनीतील कामगार,सामाजिक,शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच गोवे ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,आई,एक मुलगा,चार मुली,बहिणी,पुतणे,भावजय,जावई,नातवंडे,व मोठा दहिंबेकर परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी व उत्तरकार्य विधी एकाच दिवशी रविवार दि.१४/११/२०२१ रोजी त्य...