कविलवहाल येथे हुतात्मा नाग्या कातकरी स्मृतिदिनानिमित्त पॅन कार्ड कॅम्पचे आयोजन


या कॅम्पची सुरुवात हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या विषयी माहिती देऊन त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून करण्यात आली या कॅम्प मध्ये सहभागी होण्यासाठी अमरदीप चॅरीटेबल ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून कित्येक दिवस आदिवासी बांधवांना प्रवृत्त करण्यासाठी वाडी भेटी करून त्यांना त्याचे महत्त्व पटवून दिले यामध्ये कॅम्पमध्ये एकूण 73 लोकांनी सहभाग घेतला होता.या कॅम्पचे श्रेय चॅरीटेबल ट्रस्ट माणगाव च्या संचालिका रुबिना मॅडम, प्रिया मॅडम यांना तसेच निर्मला निकेतन कॉलेज अप सोशल वर्क मुंबई (BSW ) या समाजसेवा पदवीचे शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थी अल्पेश रामा पवार यांनी तसेच मंगेश नाईक यांनी अथक परिश्रम करून कॅम्प यशस्वी केले.
Comments
Post a Comment