Posts

Showing posts from September, 2021
Image
  अलिबाग मूरुड विधानसभा आमदार महेंद्रशेठ दळवी व जिल्हा परिषद सदस्या मानसीताई दळवी यांंच्या विशेष प्रयत्नाने 632 लाभार्थींनी घेतला लसीकरणाचा लाभ           अलिबाग  (जयप्रकाश  पवार) अलिबाग तालूक्यातील रामराज येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये कोवीड19मोफत लसीकरण शिबीर राबविण्यात आले.या वेळी शिवसेना नेत्या सौ मानसीताई दळवी यांंच्या हस्ते सदर लसीकरण शिबीराचा शूभारंभ करण्यांत आला. यावेळेस मा.श्री बाळाशेठ तेलगे, शिवसेना उपतालूका प्रमूख आप्पा पालकर, विभाग प्रमूख पृथ्वीराज पाटील, कृष्णाभाई म्हात्रे, शिवसेना नेते, उपविभाग प्रमूख महेश शिंदे, जनार्दन भगत, मंगेश म्हात्रे, जगदिश गायकर, जिवन म्हात्रे, गिरीष शेळके,संतोष म्हात्रे, रसिक पाटील, गजानन पाटील, संदिप चाचड, अनंत पूनकर, भरत पालकर, विशाल पाटील,व शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी बहूसंख्येने उपस्थित होते. विषेश म्हणजे तालुक्यामध्ये प्रथमच एका दिवसामध्ये 632लसीकरण करण्यात आले.यावेळी विभागातील अनेक लाभार्थी यांनी मोठ्या ऊत्साहाने याचा लाभ घेतला.आमदार महेंद्र शेठ दळवी व शिवसेना नेत्या सौ.मानसीताई दळवी त्याच प्रमाण...
Image
  रोहा आमडोशी येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कार्यशाळेस महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद वाकण -नागोठणे (वर्षां जांभेकर ) रोहा कृषिविभागाच्या वतीने बुधवार दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी आमडोशी येथील श्री हनुमान मंदिर सभागृहात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महिला सक्षमीकरणासाठी या योजना कशा लाभदायक आहेत याचे मार्गदर्शन या वेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना केले. महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वाने आपला छोटा उद्योग उभा करावा व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. तसेच महिला बचत गट व महिला समुहाने एकत्रित संघटित होऊन काम करणे गरजेचे असल्याची माहिती यावेळी उपस्थितांनी दिली . उत्स्फुर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या विविध गावांतून आलेल्या बचत गटांच्या प्रमुख महिला पदाधिकारी यांना शासन आपणास हातभार लावण्यासाठी विविध योजना कार्यान्वित करीत आहे,आपण त्यांचा लाभ घेतला पाहिजे तसेच विविध प्रकारचे बी बियाणे यांचे प्रात्यक्षिक करून पीक योजना राबवली पाहिजे तसेच भात पिकांवरील कीड रोग व त्यांचा पादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रकाच्या औषधांची योग्यवेळी...
Image
  प्रेरणा मतिमंद मुलांच्या शाळेची नवीन कार्यकारिणी जाहीर         गोवे -कोलाड  (  विश्वास निकम  )    रोहा येथील ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था संचलित प्रेरणा मतिमंद मुलांच्या शाळेची नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली .प्रेरणा मतिमंद मुलांच्या शाळे ची दिनांक २६ /०९ / २०२१रोजी ४.३० वाजता दगडी शाळा मेहेंदळे हायस्कूल समोर शाळेच्या हाल मध्ये घेण्यात आलेल्या जाहीर सभेत पुढीलप्रमाणे बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्षपदी सौ. दर्शना आठवले, उपाध्यक्ष संजय आर्ते , सचिव अशोक जोशी , सहसचिव राजश्री आठवले, खजिनदार रामनरेश कुशवाहा , सहखजिनदार श्री निवास वडके , सदस्य श्रिया जोशी सदर सभेमध्ये मागील सभेचा अजेंडा वाचुन मंजूर करण्यात आला , अध्यक्षा दर्शना आठवले यांनी हिशोब वाचुन झाले नंतर सर्वानुमते मंजूर करण्यात आला. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी च्या विषयांवर विचार विनिमय करण्यात आले. या वेळी अध्यक्षांनी शाळे विषयी माहिती देताना सांगितले आपली आपली शाळा ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था ही एक शासनमान्य ...
Image
रोहा तालुक्यात गोमातेची कत्तल करून मांस  रातोरात लंपास पहूर फाट्यानजीक घडला प्रकार     कोलाड परिसरात एकच खळबळ गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यात हिंदू संस्कृतीला काळीमा फासेल अशी दुर्दैवी घटनाच म्हणावी लागेल असा प्रकार घडला असल्याचे निदर्शनास येत असून कोलाड परिसरात गो मातेची कत्तल करून रातोरात मांस लंपास केला गेला असल्याचे दिसून येत आहे या घटनेने कोलाड सुतारवाडी परिसरात एकच खळबळ माजली आहे , या बाबत सविस्तर माहिती अशी की रोहा तालुक्यातील पहूर फाटा म्हणजे मुबंई गोवा महामार्गाला जोडला गेलेला मार्ग कोलाड भिरा पुणे मार्गावर असलेला पहुर फाट्या नजीक असलेल्या खडी क्रेशर जवळ काही अज्ञातांनी गो मातेची हत्या करत तिला कापून तिचा मांस रातोरात टेम्पोमध्ये भरून लंपास केले असल्याचे संकेत मिळत असून सदरच्या घटनेबाबत परिसरात एकच खळबळ उडाली असून ही हिंदू संस्कृतीला काळीमा फासणारी घटनेचा निषेध सर्वत्र व्यक्त केला जात आहे , भारत देशात हिंदू संस्कृती म्हणून गो मातेची पूजा केली जाते आशा गो मातेची विटंबना करत तीची दुर्दैवी हत्या करून मांस लंपास केला जातो याला काही या देशात राज्यात सु...
Image
   ना.म.जोशी विद्याभवन गोरेगाव येथे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा मुख्याध्यापक संघाच्यावतीने भव्य सत्कार   शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा   माणगाव ( राजन पाटील ) शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच संस्था चालकांचे कित्येक वर्षे प्रलंबित असणारे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असणारे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तथा शिक्षक सेनेचे कोकण विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा भव्य सत्कार माणगाव तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने ना म..जोशी विदया भवन गोरेगाव येथेकरण्यात आला. यावेळी मंचावर शिक्षक सेना रायगड जिल्हा अध्यक्ष मा.श्री .रविंद्र पाटील सर ,मुंब ई विभाग शिक्षक सेना सचिव लखीचंद ठाकरे सर ,माणगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.विजयकुमार विश्वनाथ पारकर सर ,उपाध्यक्ष श्री.राजेंद्र पवार सर सचिव अर्जुन कुशिरे सर ,जे.बी .सावंत हायस्कूल चे मुख्याध्यापक कांबळे सर,पेण तालुका शिक्षक सेना अध्यक्ष सुरेश मोकल ,श्री .गुलाब दवणे सर,श्री.विजय राणे सर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नवीन शिक्षक संच मान्यता ,D C P S व NPS चा रोखीने हप्ता न दिल्या बद्...
Image
कोलाड मध्ये मटका जुगारावर धाड    सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांची धडाकेबाज कामगिरी    मुद्देमाल जप्त गुन्हा दाखल    रायगड (भिवा पवार)    कोलाड पोलीस ठाण्याचे कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या पथकाने धडाकेबाज कामगिरी केली असून कल्याण मटका जुगार खेळ खेळविणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशी की दिनांक 27 सप्टेंबर रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार कोलाड पोलिसांनी  मौजे वरसगाव गावच्या हद्दीत पद्मावती नगर तलाठी ऑफिस लगत वळणावर डांबरी रोडवर आरोपी संदेश जाधव वय 24 वर्षे रा. सिद्धाई  अपार्टमेंट र्रोहा मूळ गाव माणगाव  हा वरील तारखेच्या वेळी या ठिकाणी स्वतःच्या फायद्याकरता लोकांकडून पैसे घेऊन कल्याण नावाचा मटका जुगार हारजितीचा खेळ खेळविताना अजून आला आढळून आला सदर इसमाकडू चिट्ठयांचा बंच प्रत्येक चिठ्ठीवर लिहिलेले कल्याण लिहिलेले मजकूर आढळून आला. सदर सदर इसमावर कोलाड पोलीस ठाण्यात पोस्टेगुर नं 0078 /2021 जुगार अधिनियम1867 कलम 12 अ प्रमाणे कोलाड पोली...
Image
  भरधाव ट्रेलरची दुचाकीस्वाराला धडक, दुचाकीस्वार जागीच  ठार  चालक फरार   दुचाकीस्वाराचा एक महिन्यापूर्वी झाला होता साखरपुडा    कोलाड ते विळा ट्रेलर अपघाताची  मालिका सुरूच   ट्रेलर अपघात, वेगावर नियंत्रण या साठी  लोकप्रतिनिधी भांडत नाहीत भांडतात ते फक्त आणि फक्त भंगारा साठी जनतेत चर्चा     दुर्घटनेने सर्वत्र हा हा कार ,                रायगड ( भिवा पवार) ( श्याम लोखंडे)                   मुबंई गोवा महामार्गाला जोडला गेलेला कोलाड सुतारवाडी महामार्गावर अत्यन्त धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली असून भरधाव ट्रेलरने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सुतारवाडी येथील ढोकलेवाडी नजीक घडली आहे मालवाहू ट्रक ट्रेलर चा चालक फरार झाल्याने सदर घडलेल्या घटनेमुळे  सर्वत्र हा हा कार मजला आहे . सदर दुचाकीस्वार (मयत) मंगेश हिलम याचा एक महिन्यापूर्वी साखरपुडा झाला होता.  तो कुटुंबातला कमवता एकुलता एक मुलगा होता....
Image
  शिक्षक सेना दक्षिण रायगड संपर्क प्रमुख पदी गणेश पवार यांची नियुक्ती   रायगड जिल्ह्यात होतोय अभिनंदनाचा वर्षाव            माणगाव ( राजन पाटील )आगामी होणाऱ्या विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीला आज शिक्षण क्षेत्रातील जाण नसणारे अनेक पक्ष व संघटनांचे पदाधिकारी घुडघ्याला बाशिंग बांधून आहेत मात्र आजच्या मितीस शिक्षण क्षेत्रातील मुख्याध्यापक ,शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्थाचालक यांची अनेक प्रश्न महाराष्ट्र शिक्षक सेनेचे कोकण विभाग अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना   गोरेगाव येथील शासकीय विश्रामगृहात शिक्षकांचे अनेक प्रश्न समजून घेण्याच्या सत्रात दक्षिण रायगडातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधूंचे प्रश्न सोडवण्यासाठी साई पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा लोकमान्य ज्ञानदिप विद्या मंदिराचे सर्वेसर्वा श्री.गणेश नारायण पवार यांची शिक्षक सेनेच्या दक्षिण रायगड संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी शिक्षक सेना रायगड जिल्हा अध्यक्ष ...
Image
  थरमरी आदिवासी वाडी येथे हुतात्मा नाग्या महादू कातकरी स्मुर्तीदिन मोठ्या उत्साहात संपन्न                         निजामपूर (प्रतिनिधी )                                    माणगाव तालुक्यातील निजामपूर जवळील थरमरी येथे 25 सप्टेंबर रोजी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या स्मृती दिन साजरा करण्यात आला. नाग्या बाबांना अभिवादन करण्यासाठी चिरनेर -उरण येथे सर्वांनाच जाता येत नाही त्यांचा इतिहास सर्वांना माहित होत नाही. नाग्या बाबांचा इतिहास लहानापासून मोठ्यांपर्यंत कळावा त्यापासून प्रेरणा घेऊन नवीन क्रांती निर्माण करावी यासाठी थरमरी आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांनी यावर्षी हुतात्मा नाग्या बाबांचा थरमरी आदिवासी वाडीतच स्मृतिदिन साजरा केला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटना जिल्हाध्यक्ष पत्रकार भिवा पवार हे उपस्थित होते पत्रकार भीवा पवार यांनी नाग्याबाबा याच्या जीवनातील अनमोल माहिती ग्रामस्थांना दिली....
Image
  कविलवहाल येथे हुतात्मा नाग्या कातकरी स्मृतिदिनानिमित्त पॅन कार्ड कॅम्पचे आयोजन माणगाव (प्रतिनिधी माणगाव  तालुक्यातील कविलवहाल व खिंड आदिवासी वाडी येथे 1930 च्या चिरनेर  जंगल सत्याग्रह मध्ये हुतात्मा झालेले  आदिवासी समाजाचे तारणहार हुतात्मा नाग्या महादू कातकरी स्मृतिदिनानिमित्त अमरदीप चॅरीटेबल ट्रस्ट माणगाव या संस्थेच्या वतीने पॅन कार्ड कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पची सुरुवात हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या विषयी माहिती देऊन त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून करण्यात आली या कॅम्प मध्ये सहभागी होण्यासाठी अमरदीप चॅरीटेबल ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून कित्येक दिवस  आदिवासी बांधवांना  प्रवृत्त करण्यासाठी वाडी भेटी करून त्यांना त्याचे महत्त्व पटवून दिले यामध्ये कॅम्पमध्ये एकूण 73 लोकांनी सहभाग घेतला होता. या कॅम्पचे श्रेय चॅरीटेबल ट्रस्ट माणगाव च्या संचालिका रुबिना मॅडम, प्रिया मॅडम यांना तसेच निर्मला निकेतन कॉलेज अप सोशल वर्क मुंबई (BSW ) या समाजसेवा  पदवीचे शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थी अल्पेश रामा पवार यांनी तसेच मंगेश ...
Image
  माणगाव तालुक्यातील येरद (शितोळ) आदिवासी वाडी येथे हुतात्मा नाग्या कातकरी स्मृतिदिन  उत्साहात संपन्न जल- जंगल- जमीन यांच्यावर फक्त  आदिवासींचाच अधिकार   नाग्याबाबा अमर रहे    घोषणानी येरद परिसर   दुमदुमला कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रबोधनाचा कार्यक्रम     लहान आदिवासी मुलांसाठी खेळणी ग्रंथालयाचे  उद्घाटन          निजामपूर (प्रतिनिधी ) महात्मा गांधीजींच्या विचारानीं प्रेरित झालेल्या तसेच 1930 जंगल सत्याग्रह मध्ये भाग घेऊन हुतात्मा  झालेले तसेच आदिवासी समाजाच्य समाजाचे शिरोमणी, आदर्श असणारे हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा स्मृतिदिन  माणगाव तालुक्यातील निजामपूर जवळील येरद शितोळ आदिवासींमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वाडीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम जाधव यांच्या हस्ते हुतात्मा नाग्या बाबा व भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच मैत्रकुल जिनियस परिवाराच्या वतीने देशभक्तीपर गीत गायन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तथा रायगड जिल्हा एकलव्य आदिव...
Image
  खांब चिल्हे देवकान्हे बाहे विभागातील साखरचौथ गणरायांना भक्तिमय वातावरणात निरोप  कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील खांब चिल्हे देवकान्हे विभागातील खांब नडवली तळवली तर्फे अष्टमी चिल्हे धानकान्हे देवकान्हे आणि बाहे मुठवली खुर्द या गावात कोरोना संसर्गाचा व शासकीय यंत्रणेचा पालन करत संकष्टी चतुर्थी निमित्त सार्वजनिक साखरचौथीच्या गणरायाची प्रतिष्ठापना पूजन करून हा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात व उत्साहात साजरा करण्यात आला.  खांब येथे खांबकर आळी  येथे गेली आठ वर्षांपासून संजय भोसले तसेच पाचवे वर्ष खांब येथे टवले आली येथे या सार्वजनिक उत्सवाला सुरवात केली तसेच नडवली येथे उदय व्यायाम मित्र मंडळ आणि जाधव कुटूंबियाच्या वतीने आपली नेहमीची परंपरा कायम राखत लहान थोरांशी हा उत्सव भक्तिभावाने साजरा करत आहेत तर तळवली तर्फे अष्टमी येथे जय हनुमान मित्रमंडळाने तळवली गावठाण येथ नंदकुमार मरवडे यांच्या निवस्थानी प्राण प्रतिष्ठापना करत गेली सहा वर्षांपासून हा उत्सव साजरा करत ग्रामस्थ महिला मंडळ युवक युवती एकत्रित येऊन मोठ्या भक्ती भावाने उत्सवाचा आनंद घेत साजरा करतात तसेच चिल्...
Image
  प्रत्येक सामाजिक उपक्रमात रिलायन्स इंडस्ट्रिजचा मोलाचा वाटा-: आमदार अनिकेत तटकरे      सुतारवाडी ( हरिश्चंद्र महाडिक )     सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान आणि रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 सप्टेंबर 2021 रोजी कोविड-19 चे 800 डोस येरळ ग्रामपंचायत, जामगाव ग्रामपंचायत आणि कुडली ग्रामपंचायत अशा तीन ग्रामपंचायती मिळून देण्यात आले.  या डोसाचा शुभारंभ येरळ ग्रामपंचायतीच्या कार्यालयात विश्वनाथ बंगाल यांना डोस देऊन करण्यात आला. या 800 डोस चा शुभारंभ विधानपरिषद सदस्य आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते येरळ ग्रामपंचायत, ग्रामपंचायत जामगाव, आणि ग्रामपंचायत कुडली येथे करण्यात आला.   यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितले प्रत्येक सामाजिक उपक्रमात रिलायन्स इंडस्ट्रीजचा मोलाचा वाटा आहे. खासदार सुनिलजी तटकरे साहेबांनी सामाजिक उपक्रमासाठी ज्या ज्या वेळी मागणी केली त्या त्या वेळी रिलायन्स इंडस्ट्रिजचा मोलाचा वाटा असतो. रिलायन्स इंडस्ट्रीजने प्रत्येक ग्रामपंचायतीला डोस देण्यासाठी डाटा तयार करण्यासाठी वेगळी टीम तया...
Image
  गोवे येथे सुनिल तटकरे युवा  प्रतिष्ठान तर्फे आदिवासी  बांधवाना धान्याचे किट वाटप                               गोवे-कोलाड (विश्वास निकम )                 गुरुवार दि.२३ सप्टेंबर २०२१ रोजी आमदार अनिकेतभाई तटकरे व रायगडच्या पालक मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे गोवे येथील आदिवासी बांधव यांना धान्यचे किट वाटप करण्यात आले.                   वीट भट्टी तसेच इतर ठिकाणी मोल मजुरी करणारा आदिवासी समाज याला पावसाळ्यात जून नंतर दसऱ्या पर्यंत कोणतेही काम उपलब्ध नसते यामध्ये दोन वर्षां पासुन कोरोनाच्यामुळे अनेकांचे काम बंद असल्यामुळे आदिवासी बांधव यांच्यावर उपसमारीची वेळ आली आहे. यामुळे सामाजिक बांधिलकी जाणीव राखत अनेक वर्षापासून कोलाड विभागात सुनिल युवा प्रतिष्ठान तर्फे जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात करण्यात येत आहे.                 सुनिल तटकरे...
Image
  रोहा पंचायत समितीच्या सभापतींनी घेतली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पेण,यांची भेट, आदिवासी समाजाला भेडसावणाऱ्या समस्या, शिक्षण, आरोग्य, वैयक्तिक योजना, याबाबत  केली चर्चा                      रायगड (भिवा पवार )                                         रोहा  पंचायत समितीच्या सभापती गुलाब ताई वाघमारे यांनी 23 सप्टेंबर रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण रायगड  कार्यालयास भेट दिली त्या वेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सहायक अधिकारी सतीश शरमकर योगेश पाटील वाघ मॅडम, दळवी, या अधिकाऱ्यांशी  आदिवासी समाजाला भेडसावणाऱ्या समस्या तसेच रोहा तालुक्यातील कवळटे आदिवासीवाडी यांचे पुनर्वसन करण्याची मागणी तसेच धामणसे वाडीतील अंतर्गत रस्ता शेनवई आदिवासीवाडी नळपाणी योजना मंजूर करण्याबाबत तसेच शिक्षण, आरोग्य,वैयक्तीक योजना, याविषयी चर्चा केली त्यावेळी कातकरी आदिम संघटना महाराष्ट्र राज्य रायगड जिल...
Image
माणगाव तालुक्यातील देगाव आदिवासी वाडीतील ग्रामस्थांचा कोवीड लसीकरण शंभर टक्के   करण्याचा संकल्प ,   एका दिवसात झाले 167 बांधवांचे लसीकरण, 50 जण लस उपलब्ध झाल्यावर घेणार देगाव आदिवासीवाडी ग्रामस्थांवर  जिल्ह्यातुन होतोय, अभिनंदनाचा वर्षाव                                       रायगड (भिवा पवार )                                     कोविड -19 कोरोना व्हायरसच्या वाढत्या महामारीच्या आव्हानांना  आणि धोक्याला तोंड देण्यासाठी आपण तयार आहोत ते सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकार व भारत सरकार आवश्यक ती पावले उचलत आहे स्थानिक पातळीवर व्हायरस चा प्रसार रोखण्याचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे नागरिकांना योग्य माहिती देऊन सक्षम करून त्यांना कोविड  लसीकरण करणे आहे. मात्र कोवीड  लसीकरण बाबतीत आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने काही संभ्रम, तसेच  भीती वाटत असल्याने लस...
Image
  मालसई येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कार्यशाळेस महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा कृषिविभागाच्या वतीने बुधवार दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोजी मालसई येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महिला सक्षमीकरणासाठी या योजना कशा लाभदायक आहे याचे मार्गदर्शन या वेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना केले. महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वाने आपला छोटा उद्योग उभा करावा व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. तसेच महिला बचत गट व महिला समुहाने एकत्रित संघटित होऊन काम करणे गरजेचे आहे.शासन आपणास हातभार लावण्यासाठी विविध योजना कार्यान्वित करीत आहे,आपण त्यांचा लाभ घेतला पाहिजे असे प्रतिपादन कृषी पर्यवेक्षक दिगंबर साळे यांनी केले.सुतार यांनी या योजनांची चांगल्या प्रकारे माहिती उपस्थित महिलांना दिली. यावेळी रविना मालुसरे यांनी मालसई गावातील महिला बचत गटांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक दिगंबर साळे,सुतार ...
Image
  सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे कोलाड विभागातील आदिवासी बांधवांना धान्य किट वाटप      गोवे-कोलाड (विश्वास निकम )                                    सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार सुनिल तटकरे यांच्या आदेशानुसार कोलाड विभागातील आदिवासी बांधवांना धान्य किट वाटप करण्यात आले. चिंचवली आदिवासीवाडी, तळवळी आदिवासीवाडी,आंबेवाडी आदिवासीवाडी, पुई आदिवासीवाडी,कोलाड आदिवासीवाडी,पाले बुद्रुक आदिवासीवाडी आदी सात आदिवासी वाड्यांना एकूण ५५०आदिवासी बांधवांच्या कुटुंबांना धान्य किट वाटप करण्यात आले.             यावेळी सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते राकेश शिंदे,आंबेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्रीकांत चव्हाण,गणेश वाचकवडे, संजय सानप, सतिश मानकर, महेंद्र वाचकवडे,कुमार लोखंडे,राकेश लोखंडे, वसिम नुराजी, विजय बागुल, महेश पवार, महेंद्र पानसरे, बाळा महाबळे, निलेश महाबळे, ...
Image
  सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे कोलाड हायस्कूलला विविध वस्तूंचे वाटप                    कोलाड ( विश्वास निकम )                                      सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. अनिकेतभाई तटकरे यांच्या संकल्पनेतून सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या द.ग तटकरे माध्यमिक विद्यालय कोलाड या विद्यालयाला विद्यार्थ्यांसाठी मास्क, सेनिटायझर, हँडग्लोज आदी वस्तू सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानतर्फे देण्यात आल्या. सोमवार पासून काही वर्ग सुरु झालेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सदरी वस्तू देण्यात आल्या. सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते राकेश शिंदे यांच्याकडे वरील वस्तूंची मागणी करण्यात आली होती. राकेश शिंदे यांनी खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित वस्तूंचे वाटप केले. द.ग तटकरे माध्यमिक विद्यालय कोलाडचे मुख्याध्यापक श्री शिरीष येरूणकर यांच्याकडे वरील वस्तूंचे कीट देण्यात आले. य...
Image
  पितृपक्ष आणि श्राद्धविधी : शंका अन् समाधान’ या विशेष संवादातून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन ! पितृऋण’ फेडण्यासाठी ‘श्राद्ध’ आणि नित्य ‘श्री गुरुदेव दत्त’ जप करा सदगुरु  नंदकुमार जाधव, धर्मप्रसारक, सनातन संस्था           गोवे-कोलाड (विश्वास निकम ) हिंदु धर्मात ईश्‍वरप्राप्तीसाठी ‘देवऋण’, ‘ऋषिऋण’, ‘पितृऋण’ आणि ‘समाजऋण’ असे चार प्रकारचे ऋण फेडण्यास सांगितले आहे. यातील ‘पितृऋण’ फेडण्यासाठी पितरांच्या मुक्तीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. ‘श्राद्ध’ करणे हे पितरांच्या मुक्तीसाठी महत्त्वाचे आहे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी पितृपक्षात पुरोहितांना बोलावून श्राद्धविधी करावा; मात्र जेथे कोरोनामुळे पुरोहित वा श्राद्धाच्या सामग्री अभावी श्राद्ध करणे शक्य न झाल्यास आपद्धर्म म्हणून संकल्पपूर्वक आमश्राद्ध, हिरण्यश्राद्ध किंवा गोग्रास अर्पण करावा. तसेच पूर्वजांना पुढील गती मिळावी आणि अतृप्त पूर्वजांचा त्रास होऊ नये, म्हणून नियमितपणे साधना करणेही आवश्यक आहे. यासाठी श्राद्ध विधीला जोडून पितृपक्षात अधिकाधिक वेळ, तसेच अन्य काळात प्रतिदिन किमान 1 ते 2 घंटे ‘श्री गुरुदेव दत्त’ हा ...
Image
  पितृपक्ष आणि श्राद्धविधी करण्याचे महत्त्व                   गोवे-कोलाड (विश्वास निकम )                       हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक असते. माता-पिता तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठीचा संस्कार म्हणजेच ‘श्राद्ध.’ यावर्षी 21 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष आहे. प्रतिवर्षी पितृपक्षातील कृष्णपक्षात महालय श्राद्ध केले जाते. श्राद्धविधी हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा आचार असून त्याला वेदकाळाचाही आधार आहे. अवतारांनीही श्राद्धविधी केल्याचा उल्लेख आढळतो. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म-शक्ती सामावलेली असते. श्राद्धाचे इतके महत्त्व असतांनाही आज हिंदूंमधील धर्मशिक्षणाचा अभाव, त्यांचा अध्यात्मावरील अविश्वास, त्य...
Image
  कोलाड खांब विभागातील अनंत चतुर्दशीच्या गणपती बाप्पांचे विसर्जन मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न                  कोलाड (श्याम लोखंडे )                                   मुंबई-गोवा महामार्ग लागत जोडल्या गेलेल्या कोलाड खांब विभागातील ग्रामस्थांनी नजिक असलेल्या कुंडलिका,महिसदरा नदीत तसेच या परिसरातील तलाव या ठिकाणी अनंत चतुर्दशी दिवसाच्या गणपती बाप्पा विसर्जन कोरोना संकटावर मात करत व सोशल डिस्टनचा पालन करत भक्तिमय वातावरणात बाप्पांना निरोप देण्यात आला.           मुंबई-गोवा महामार्गावरील लगत असणाऱ्या कोलाड-आंबेवाडी,वरसगाव, पुई, पुगाव,गोवे,मुठवली, शिरवली, खांब, वैजनाथ,व परिसरातील नडवली, तळवली तर्फे अष्टमी, चिल्हे , धानकान्हे, बाहे, देवकान्हे सह विभागातील अन्य आदिवासी वाड्यापाड्यांवरील सर्व गणेश भक्तांनी गणरायाला गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या आणि राज्यासह देशावर व संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना संसर्ग विषाणूचे संकट दूर कर ...
Image
  महाड-पोलादपूर मार्गावर बेकायदा खैर तस्करी करणारा ट्रक पकडला, 3 लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त       वनविभाग फिरते पथकाची       धडक कामगिरी  रोहा (समीर बामुगडे) : महाड तालुक्यातील मौजे कापडे महाबळेश्वर पोलादपूर मार्गावर खैर सोलिव लाकुड वाहतूक करत असताना शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास वनविभागाच्या पथकाने कारवाई केली. यात टाटा 407 टेम्पो क्रमांक MH.04.EL.2288आणि खैर सोलिव नग 231 घमि-2.916 किंमत 347047/- रुपयांचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गजानन यशवंत दिघे चालक मालक (रा. ढालकाठी, ता. महाड) व निलेश गंगाराम साळवी (रा. रेपोली) सहआरोपी दीपक महाडिक (रा. दापोली) यांच्यावर वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत अधिक माहिती अशी की, उपवसंरक्षक रोहा व सहाय्यक वनरक्षक रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते पथक रोहा यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून शुक्रवारी सायंकाळी 7.30 वा. टाटा 407 टेम्पो क्रमांक MH/04/EL/2288 मौजे कापडे महाबळेश्वर पोलादपूर मार्गावर थांबवून तपासले असता त्यामधे खैर सोलिव लाकडे विनापरवाना आढळून आली संब...
Image
   आदिवासी समाजाला शवरुग्णवाहीका विनामूल्य मिळणेबाबत आदिवासी कातकरी संघटनेने रायगड जिल्हाधिकारी, जिल्हाआरोग्य अधिकारी, यांना दिले निवेदन शव रुग्णवाहिका नसल्याने रायगडातील आदिवासी कातकरी समाजाची  होते हेळसांड   आदिवासी समाजाकडे मते मागणार्‍यांना जाग येईल का? रायगड ( भिवा पवार)  रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असून  हातावर कमावून पानावर खाणारा हा कष्टकरी समाज खूप हलाखीचे जीवन जगत आहे. रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाचा  शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक, सांस्कृतिक, विकास झालेला नाही.  आदिवासी समाज  भारताचा मूळ मालक असताना खूप हलाखीचे जीवन जगत आहे त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यातीलच महत्त्वाची समस्या म्हणजे आरोग्याची समस्या असून रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना मोफत व शव रुग्णवाहिका मिळावी यासाठी रायगड जिल्हा आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान नाईक यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग जिल्हा आरोग्य अधिकारी अलिबाग यांना निवेदन दिले आहे याबाबत पत्रकारांना दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी असे म्हटले आहे की  अलिब...
Image
  श्रीमती अर्पिता रॉय श्रीवास्तव ग्लॅमरस पब्लिक स्पिकर पुरस्काराने सन्मानित    मुंबई  प्रतिनिधी 03 सप्टेंबर 2021 रोजी कोर्टयाड मेरीयट, मुंबई येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ग्लॅमर प्रोजेक्ट या उपक्रमा अंतर्गत        ही  निवड करण्यात आली. या उपक्रमामध्ये 47 सौन्दर्यवतींनी भाग घेतला होता. अर्पिता रॉय यांचे आकर्षक व्यक्तिमत्व, सौन्दर्य, सामाजिक, शैक्षणिक कार्य, जनसंपर्क कौशल्य, सामान्य ज्ञान, निर्णय क्षमता इत्यादी गुणांचे परीक्षण करण्यात आले होते.     केवळ शरीराने सुंदर असून चालत नाही, मन आणि कार्य ही सुंदर असावे लागते हेच या निवडीतून निदर्शनास आले आहे. श्रीमती समीरा मर्चण्ट यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. प्रा. सुभाष सर,  अजय प्रकाश यांनी रॉय यांचे अभिनंदन केले .