
रायगड जिल्हातील रोहा तालुक्यातील घटना! वृद्ध महिलेची सोनसाखळी खेचून पळून जाणाऱ्या जोडप्याला रोहा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अखेर आवळल्या नवरा बायकोच्या मुसक्या! रोहा पोलिसांच्या कामगिरीचे रायगड जिल्ह्यात भरभरून कौतुक! कोलाड(विश्वास निकम) चणेरा मार्गावरील भागीरथीखार येथे एक वृध्द महिला नीलिमा नारायण वरसोलकर( ६५ वर्षे रा.भागीरथीखार ता.रोहा ) या सुखी मच्छी विकत असताना सदर ठिकाणी एक नवरा बायको जोडपे गाडी वरून येऊन थोडी सुखी मच्छी विकत घेतली. मच्छी विक्री करणाऱ्या महिलेच्या गळ्यात सोनसाखळी असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर ते दोघे शेडसई बाजूकडे निघून गेले. काही वेळानंतर त्वरीत त्यांनी हेल्मेट घालून तोंडाला रुमाल बांधून सदर वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील ३ तोळ्याची सोन्याची चैन जबरदस्तीने खेचून तेथून रोहे शहराच्या दिशेने पळ काढला. या घटनेनंतर घाबरलेल्या वृद्ध महिलेने आरडाओरड केल्याने तेथील जागरूक नागरिकांनी ताबडतोब रोहा पोलीस स्टेशन येथे संपर्क करुन सदर घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून खारी चे...