कोलाड हायस्कूलमधील

 माजी विद्यार्थ्यांचा

 महामेळावा!

   मेळाव्यात होणार अनेक  गुरुजनांचा सत्कार! 


   कोलाड (विश्वास निकम ) सुधागड एज्युकेशन सोसायटीचे कोलाड हायस्कूल कोलाड मधील इयत्ता १० वी मधील सन १९८१ ते २००५ पर्यंत शिक्षण घेऊन गेलेल्या असंख्य विद्यार्थ्याचा महामेळावा रविवार दि.२ फेब्रुवारी २०२५ रोजी द.ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाड येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.

    ज्या विद्यालयात आपण शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात काम करीत आहोत याचा मुख्य श्रेय या कालावधीत विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षक वर्ग यांना जात असुन यामध्ये कर्मचारी वर्गाचा सहकार्य मोठा होता याची जाणीव ठेऊन साधारण ३२ सेवानिवृत्त शिक्षक व १३ कर्मचारी वृंद यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने सर्व माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.

    या कार्यक्रमासाठी डॉ.किशोर देशमुख तहसीलदार रोहा,श्री.रविंद्र दौंडकर उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा,श्री.संजय धुमाळ सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक ( राष्ट्रपती पदक विजेते )श्री.नितीन मोहिते सहाय्यक पोलीस निरीक्षक कोलाड या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार असुन दि.३० जानेवारी पर्यंत येणारी नावे ग्राह्य धरून चहा,नास्ता, जेवण व आसन व्यवस्था केली जाईल यामुळे प्रत्येकाने आपण येणार असल्याची नोंद करावी. अधिक माहितीसाठी सन १९८१ ते २००५ मधील माजी विद्यार्थ्यांनी शिरीष येरुणकर सर -९४२११६८४१०, संजय कुर्ले ८२३७१४९३८९, निशिकांत पाटील ९५०३४५०५५५, नरेश बिरगावले ९४२११७०८०६, प्रफुल्ल बेटकर ९३७०५२०७८७ निवृत्ती आंबेतकर ९२२५४७००५६ यांच्याशी संपर्क साधावा अशी विनंती करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog