नवजीवन विद्यामंदिर कल्याण येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न! 

 डंबेल्स,कवायत,थरार प्रात्यक्षिक तर,  

 विद्यार्थिनींनी नऊवारी साडी परिधान करून देशभक्तीपर गीतावर लेझीम
नृत्याने जिकंली कल्याणकरांची 
मने! 

    कल्याण (प्रतिनिधी ) छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित नवजीवन विद्यामंदिर कल्याण व शिशू रंजन प्राथमिक विद्यालय कल्याण यांच्या विद्यमाने नुकताच भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. 

 या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टीचे कल्याण शहर सचिव प्रकाश पाटील उपस्थित होते. या वेळी प्रकाश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणा नंतर विद्यालयामध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच  कार्यक्रमाचे प्रमुख  प्रकाश पाटील यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप  प्रज्वलन करून करण्यात आले, यावेळी नवजीवन विद्यालयातील विद्यार्थी  व शिशुरंजन प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन केले.

क्रांतिवीरांनी बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळून दिले तर अनेक समाजसुधारकांनी समाजातील विषमते विरुद्ध लढा दिला आणि समतेचा पाया रचला :- सूर्यकांत चव्हाण  

यावेळी नवजीवन विद्यालयाचे मुख्याध्यापक सूर्यकांत चव्हाण आपल्या प्रास्ताविकेमध्ये म्हणाले की भगतसिंग, राजगुरू, सुखदेव,बाबू गेनू,अशा अनेक क्रांतिवीरांनी बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळून दिले तर अनेक समाजसुधारकांनी समाजातील विषमते विरुद्ध लढा दिला आणि समतेचा पाया रचला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागामुळे आपल्याला संविधान मिळाले. भारताचे संविधान हा आपल्या लोकशाहीचा पाया असून ते आपल्या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव करून देते ती धर्माच्या जातीच्या आणि आर्थिक पातळीवरून भेदभाव करीत नाही म्हणून प्रत्येकाच्या विकासाची हमी देते म्हणूनच आपल्याला शिस्तबद्ध राहून प्रामाणिकपणे काम करून आणि एकमेकांना सहकार्य करून भारत जगात आदर्श देश बनवायचा असून विद्यार्थी  दशेतच तसा आपण संकल्प करूया अशी आपल्या प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक  सूर्यकांत चव्हाण यांनी आव्हान केले.

 प्रजासत्ताक दिन हा भारतीयांसाठी उत्साहाचा, सन्मानाचा, आणि स्वाभिमानाचा, तसेच  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्याचा, क्रांतिकारकांच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देण्याचा!:-प्रकाशजी पाटील 

 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रकाश पाटील हे विद्यार्थी मार्गदर्शन पर भाषणात म्हणाले की  प्रजासत्ताक दिन हा भारतीयांसाठी उत्साहाचा, सन्मानाचा, आणि स्वाभिमानाचा, तशेच  महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्याचा, क्रांतिकारकांच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देण्याचा आजचा दिवस असून आजच्या दिवशी आपण सर्वांनी भारत अधिक बलशाली बनवण्याचा संकल्प करूया आपल्या येणाऱ्या पिढीसाठी सुंदर, निरोगी, आणि बलशाली भारत बनवण्यासाठी आपली असून ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत राहून आपल्या देशाला आणखी मजबूत विकसित करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे म्हणून स्वच्छ सुंदर भारत निर्माण करण्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आणि सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा आपण संकल्प करू या असे आपल्या मार्गदर्शक भाषणात म्हणाले 

 यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी डंबेल्स, कवायत, योगा यांची थरारक प्रात्यक्षिक सादर केले. तर विद्यालयातील विद्यार्थिनींनी नववारी साडी परिधान करून देशभक्ती गीतावर लेझीम नृत्य सादर करून कल्याणकरांची मने जिंकली. या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेले प्रात्यक्षिक पाहून पालकही मंत्रमुग्ध झाले.  त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले.

 यावेळी नवजीवन विद्यालयाचे मुख्याध्यापक सूर्यकांत चव्हाण, शिशुरंजन प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका धनश्री मानिवडे, शिक्षिका भारती चव्हाण,अनिल पाटील सर गौरी भामरे,मंदाकिनी सोनवणे, युवराज वारुळे, भिवा पवार,मनीषा वारुळे, प्रतिभा पानसरे, पिंपळीकर मॅडम, दीक्षित मॅडम विशाल भोईर, भास्कर भालके, जनता बँकेचे सुहास धर्माधिकारी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमप्रमुख पाहुणे परिचय श्रीमती भारती चव्हाण मॅडम यांनी करून दिला तर सूत्रसंचालन भिवा पवार सर यांनी केले.

अशा प्रकारे भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन नवजीवन विद्यालय कल्याण व शिशुरंजन प्राथमिक विद्यालय कल्याण या विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog