नवजीवन विद्यामंदिर कल्याण येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न! डंबेल्स,कवायत,थरार प्रात्यक्षिक तर, विद्यार्थिनींनी नऊवारी साडी परिधान करून देशभक्तीपर गीतावर लेझीम नृत्याने जिकंली कल्याणकरांची मने! कल्याण (प्रतिनिधी ) छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित नवजीवन विद्यामंदिर कल्याण व शिशू रंजन प्राथमिक विद्यालय कल्याण यांच्या विद्यमाने नुकताच भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टीचे कल्याण शहर सचिव प्रकाश पाटील उपस्थित होते. या वेळी प्रकाश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणा नंतर विद्यालयामध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख प्रकाश पाटील यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले, यावेळी नवजीवन विद्यालयातील विद्यार्थी व शिशुरंजन प्राथ...
Posts
Showing posts from January, 2025
- Get link
- X
- Other Apps
कोलाड हायस्कूलमधील माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा! मेळा व्यात होणार अनेक गुरुजनांचा सत्कार! कोलाड (विश्वास निकम ) सुधागड एज्युकेशन सोसायटीचे कोलाड हायस्कूल कोलाड मधील इयत्ता १० वी मधील सन १९८१ ते २००५ पर्यंत शिक्षण घेऊन गेलेल्या असंख्य विद्यार्थ्याचा महामेळावा रविवार दि.२ फेब्रुवारी २०२५ रोजी द.ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाड येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. ज्या विद्यालयात आपण शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात काम करीत आहोत याचा मुख्य श्रेय या कालावधीत विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षक वर्ग यांना जात असुन यामध्ये कर्मचारी वर्गाचा सहकार्य मोठा होता याची जाणीव ठेऊन साधारण ३२ सेवानिवृत्त शिक्षक व १३ कर्मचारी वृंद यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने सर्व माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी डॉ.किशोर देशमुख तहसीलदार रोहा,श्री.रविंद्र दौंडकर उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा,श्री.संजय धुमाळ सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक ( राष्ट्रपती पद...