नवजीवन विद्यामंदिर कल्याण येथे संविधान दिन उत्साहात संपन्न

संविधान जनजागृती रॅलीने जिंकली कल्याणकरांची मने!    

  संविधान दिनाचे औचित्य साधून चित्रकला स्पर्धेचे आयोजन

कल्याण (प्रतिनिधी ) छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित  नवजीवन विद्यामंदिर कल्याण   व शिशुरंजन प्राथमिक शाळा कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 प्रथमता कल्याण शहरात विद्यार्थ्यांची संविधान जनजागृती पर रॅली काढण्यात आली कल्याण गोरेबाग मधील परिसर संविधान दिनाच्या घोषणेने दुमदुमुन गेला होता. ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली होती.

    त्यानंतर विद्यालयामध्ये  संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले नवजीवन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सूर्यकांत चव्हाण व शिशुरंजन प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका धनश्री मानीवडे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले  


 यावेळी प्रमुख वक्ते म्हूणन भिवा पवार सर उपस्थित होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संविधान निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे  योगदान याविषयी माहिती देऊन आपले हक्क अधिकार  घेताना आपल्या कर्तव्याची जाणीव आपल्याला असायला पाहिजे. तसेच भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून  भारतात विविधतेमध्ये एकसंघ ठेवण्यासाठी संविधान  महत्त्वाची भूमिका बजावत आहे   देशाच्या प्रत्येक नागरिकाला समान हक्क व कर्तव्याची जाणीव करून देणे हा या दिनाचा उद्देश आहे. तसेच विद्यार्थी आपले शिक्षण घेत असताना एकदा तरी संविधानाचे वाचन करावे व प्रत्येकाच्या घरी संविधान असावे असे आवाहन करून संविधानाबाबत मार्गदर्शन केले.









 यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख गौरी भामरे यांनी केले यावेळी नवजीवन विद्यालयचे मुख्याध्यापक श्री सूर्यकांत चव्हाण, शिशुरंजन प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका धनश्री मानिवडे, शिक्षिका भारती चव्हाण, अनिल पाटील, प्रतिभा पानसरे, युवराज वारुळे, मनीषा  वारुळे, पिंपळीकर मॅडम, विशाल भोईर,इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर विद्यालयामध्ये संविधान दिन आधार पर चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या सदर संविधान दिन  नवजीवन विद्यामंदिर कल्याण व शिशुरंजन प्राथमिक विद्यालय कल्याण या विद्यालयांमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला 

Comments

Popular posts from this blog