शारदा विद्यालय पडघा येथे अविष्कार 2023- 24 "कल्पकतेकडून कृतीकडे" स्पर्धात्मक उपक्रम संपन्न!

 भिवंडी (प्रतिनिधी) छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित शारदा विद्यालय पडघा ता.भिवंडी जिल्हा ठाणे येथे विद्यार्थ्यांना विज्ञानाची  गोडी लागून आवड निर्माण व्हावी व वैज्ञानिक विचारशक्ती वाढावी हा दृष्टिकोन ठेवून विभागीय स्तरावर" अविष्कार २०२३२४ कल्पतेकडून कृतीकडे "या स्पर्धात्मक उपक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ.कोमल जाधव  मॅडम यांनी आपली उपस्थिती दर्शवली .


 कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री भालेराव सर, व कोमल जाधव मॅडम तसेच पालक प्रतिनिधी सौ. शिंदे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. लहांगे सर यांनी केली त्यांनी यात AI बद्दल खूप छान माहिती दिली. त्यानंतर माननीय मुख्याध्यापकांनी मार्गदर्शनपर उद्बोधन केले .तसेच प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून विज्ञानाबद्दल माहिती दिली.

या कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिक्षण मंडळाच्या विद्यालयांनी भाग घेतला होता, त्यात विद्यामंदिर मांडा टिटवाळा शारदा विद्यालय पडघा ,विद्यामंदिर नांदकरसांगे व गंगागोजरेश्वर विद्यालय फळेगाव या शाळेतील  विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री. चिंधे सरांनी केले तसेच सौ. पांगारकर मॅडम व केदार सरांनी विज्ञान कक्षात विद्यार्थ्यांच्या प्रयोगांची मांडणी केली कार्यक्रमांमध्ये श्री तांबडे सर् व श्री. लवंगडे सरांनी प्रबोधनात्मक नाटिका सादर केली .

या कार्यक्रमाची सांगता श्रीखंडे सरांनी आभार प्रदर्शन करून केली अशा प्रकारे शारदा विद्यालय पडगा येथे "अविष्कार २०२३२४ कल्पतेकडून कृतीकडे "या स्पर्धात्मक उपक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog