शारदा विद्यालय पडघा येथे भारताचा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
भिवंडी (प्रतिनिधी) छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित शारदा विद्यालय पडघा येथे भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भिवंडी तालुक्यातील शारदा विद्यालय पडघा येथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी पंचायत समितीचे उपसभापती गुरुनाथ जाधव तसेच समाजसेवक व उद्योजक सचिन बिडवी हे उपस्थित होते.यावेळी ध्वजारोहण उपसभापती गुरुनाथ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
दीप प्रज्वलन व भारत मातेचे पूजन समाजसेवक सचिन बिडवी यांच्या हस्ते करण्यात आले विद्यालयातील शिक्षक श्री.केदार सरांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल भालेराव यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या विभूतींची माहिती प्रस्ताविकेत करून दिली.
यावेळी व्यासपीठावर उपसभापती गुरुनाथ जाधव, समाजसेवक सचिन बिडवी विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल भालेराव, पर्यवेक्षक श्री काटकर, सर,सत्र प्रमुख दिवाकर वाघ सर, धूम सर कार्यक्रमांमध्ये विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थी पालक प्रतिष्ठित नागरिक यांनी सहभाग घेतला.खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. उत्साहपूर्ण वातावरणात शारदा विद्यालय पडघा येथे भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
Comments
Post a Comment