जगात जर सर्वश्रेष्ठ कोणती संस्कृती असेल, तर ती वाचन संस्कृती:- शंकरराव म्हसकर
रोहा :(प्रतिनिधी)जेथे वाचन होते, तिथे विचार होतात आज हेच विचार आपली ध्येय ठरवायला आणि गाठायला मदतही करतात. पुस्तकातून ज्ञान आणि ज्ञानातून संपत्ती निर्माण होते. वाचनामुळे आपले भावविश्व अनुभव विश्व विस्तारते. वाचन संस्कृतीची नाळ प्रत्येक माणसाची प्राचीन काळापासून जोडली गेली आहे आताच्या प्रगत व दमछाक करणाऱ्या युगामधे वाचनाची सवय मागे पडत चालली आहे ती वाढावी,रुजावी विशेष करून ग्रामीण भागातील जनतेत वाचनाच महत्त्व पटाव वाचन संस्कृती ग्रामीण भागात रूजावी व गावाचा शैक्षणिक सांस्कृतिक विकास व्हावा तसेच" जगात जर कोणती संस्कृती श्रेष्ठ असेल तर ती म्हणजे वाचन संस्कृती आहे, असे प्रतिपादन जेष्ठ शेकाप नेते शंकरराव म्हसकर यांनी केले.
आपल्या निवासस्थानी ठेवलेल्या छोट्या कार्यक्रमात केली यावेळी त्यांच्या भगीनी सौ.सुप्रियाताई क्षीरसागर यांनी आपले विचार मांडताना सांगितलेली की आमचे वडील हरिभाऊ म्हसकर यांना पुस्तक वाचनाची खुप आवड होती मुंबई येथे कापड मिलमधे काम करत असताना त्यांनी आपला वाचन छंद जोपासताना सामाजिक कार्याचा वसा ते जोपासत होते.
गावातील गावाकडील कित्येक लोकाना मुंबईत रोजगार उपलब्ध करून दिला रूग्णांची सेवा केली आपले जिवन समाजासाठी कसे उपयोगी पडेल यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असायचे त्यांचा हा वसा आमचे बंधू शंकरराव चालवताना दिसत आहेत त्यांनी पुगाव ग्रामीण भागात स्वर्गीय हरिभाऊ म्हसकर वाचनालय ऊभे करून गावामधे वाचन संस्कृतीचे रोपटे लावले आज हे रोपटे वेगाने वाढत असून पुगाव,खांब परीसरातील शेकडो आबालवृद्ध याचा लाभ घेताना दिसत आहेत. मराठा समाज माजी अध्यक्ष सुधीर क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगीतले की शहरी भागात शैक्षणिक सांस्कृतिक उपलब्धता असते परंतू ग्रामीण भागात याची उणिव भासते. यासाठी गावागावात शैक्षणिक, सांस्कृतिक वाचन चळवळ उभी राहीली पाहीजे.
यावेळी सदरील कार्यक्रमात माजी शाखा अभियंता गजानन वैद्यरावसाहेब यांनी आपल्याकडील विविध विषयांवरील पुस्तके स्वर्गीय हरिभाऊ म्हसकर वाचनालयास भेट दिली व वाचनालयाच्यावतीने त्यांचा शाल,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच वाचन संस्कृती ग्रामीण भागात रूजावी यासाठी प्रयत्नशील असणारे व प्रोत्साहन देणारे जेष्ठ मुक्त पत्रकार राजेश हजारे यांचा देखील वाचनालयच्या वतीने शाल,पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
Comments
Post a Comment