सासू सुनेचा योगायोगाने एकाच दिवशी उत्साही वातावणात वाढदिवस साजरा
कोलाड (विश्वास निकम,रायगड भुषण ) चिल्हे गावातील सुनंदा गोविंद महाडिक यांचा ८० वा तर त्यांची सुन नेहा नथुराम महाडिक यांचा ४४ वा वाढदिवस मोठया उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.सासू सुनेचा वाढदिवस एकाच दिवशी येणे केवळ योगायोग असून असे क्वचितच घडू शकतो.
सुनंदा महाडिक या वयाच्या ८० वर्षी ही विविध प्रकारची कामे उत्तम प्रकारे करीत असून तरुण वयात त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या एक मुलगा व एक मुलगी यांचा मोठया मेहनतीने सांभाळ केला.परंतु त्यांच्या मुलीचे ही लग्न झाल्यानंतर तीन चार वर्षातच मुलीला एक मुलगी व एक मुलगा झाल्यानंतर तरुण वयात मुलीचा ही मृत्यू झाला.परंतु त्यांनी सर्व दुःख विसरून न डगमगता नात व नातू यांना मोठे केले.व मुलाचे ही लग्न केले.
अशीच सर्व दुःख पाठीशी घालत मुला मुली नंतर नातवंडे यांचा उत्तम प्रकारे सांभाळ करणारी सुनंदा यांचा वाढदिवस साजरा करतांना आमची बय मायाळू,आमची बय सुगरण,आमची बय सोज्वळ,आमची बय कडक, आमची बय कर्तव्य दक्ष,आमची बय शिस्त प्रिय,आमची बय मायेची पाखरण,मुलगा व नातवंडे यांची लाड करणारी असे बॅनर लिहून जणू तिच्या प्रत्येक कार्याची दख्खल घेतली व ८० वाढदिवसा निमित्ताने ८० दिवे लावुन वाढ दिवस साजरा केला.
या निमित्ताने सुनंदा यांचा मुलगा,सुन,दोन बहिणी,मेहुणे,भावांची व बहिणींची सर्व मुले,त्यांच्या सर्व सुना,सर्व भाच्या,सर्व भाचे,सर्व जावई,सर्व नातवंडे,नात जावई,सर्व पतवंडे उपस्थित होते.
तसेच तेवढ्याच उत्सहात सुन नेहा महाडिक यांचा ही ४४ वा वाढदिवस उत्सहात साजरा करण्यात आला त्यांच्या ही बहिणी,सर्व भाचे,त्यांच्या सुना,माहेरची असंख्य नातेवाईक उपस्थित होते.
Comments
Post a Comment