पत्रकार समीर बामुगडे यांना पितृशोक!

 रोहा:(प्रतिनिधी) रोहा तालुक्यातील निवी येथील जेष्ठ आदर्श शेतकरी रामा रामजी बामुगडे यांचे गुरुवारी 27 एप्रिल रोजी अकस्मात निधन झाले मृत्यु समयी ते 89 वर्षाचे होते  प्रेस संपादक व पत्रकार सेवासघाचे माजी कोकण उपाध्यक्ष समीर बामुगडे आणि दिलीप बामुगडे ,विठ्ठल बामुगडे, संतोष बामुगडे यांचे ते वडील  होत,

  स्व,रामा बामुगडे यांच्या पश्चात त्यांच्या मुले सुना नातवंडे तसेच भावकी परिवार आहे त्यानी शून्यातून विश्व निर्माण करुन निवी गावात त्याचा एक वेगळा ठसा उमटवला होता,तसेच रामा बामुगडे यानी निवी ग्रामस्थांचा 25 वर्ष खजिनदार पदाची जबाबदारी सभाळली होती त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच निवी  येथील त्यांच्या निवास्थानी मोठा जनसमुदाय लोटला होता त्यांच्या निवास्थानी अंत्यदर्शन घेऊन बामुगडे परिवाराचे सांत्वन केले त्यांच्या अंत्ययात्रेत विविध स्तरातील मान्यवरांसह उपस्थित होते 

त्याचे दशक्रियाविधी शनिवार दि 6/5/2023रोजी महादेव मंदिर येथे होणार असून तर उत्तरकार्य रविवारी दि7/5/2023मे रोजी निवी येथील निवासस्थानी होणार आहेत,

Comments

Popular posts from this blog