डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे युवासेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युनिटची स्थापना

साई /माणगांव (हरेश मोरे )रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे युवासेनेचे कॉलेज युनिटचे उदघाटन गुरुवार दि.20 एप्रिल २०२३ रोजी करण्यात आले.यावेळी विद्यापीठातील युनिट कक्ष अध्यक्ष प्रतिक साळुंके,उपाध्यक्ष देवांग उत्तेकर,सचिव सुधीर सोनावणे,उपसचिव अंकित भोईर,चिटणीस रणजीत बावणे, सरसिटणीस कुणाल तवले यांची निवड व फलकाचे अनावरण तसेच विद्यार्थ्यांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर वसतिगृह, ऍडमिशन व ईतर विषयांवर विद्यापीठ प्रशासनाला शिवसेना स्टाईलने धारेवर धरत निवेदन ही देण्यात आले.महाड विधानसभा समन्वयक रोहित पारधे यांच्या अथक प्रयत्नाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमास संजय कदम द.रायगड जिल्हा संपर्कप्रमुख,अनिल नवगणे, द.रायगड जिल्हा प्रमुख,सुधीर ढाणे, युवासेना महाराष्ट्र विस्तारक,चेतन पोटफोडे युवासेना द.रायगड जिल्हाधिकारी, रोहित पारधे महाड विधानसभा समन्वयक,यतीन धुमाळ. युवासेना रायगड जिल्हा चिटणीस,राकेश मोरे, युवासेना विधानसभा अधिकारी,अक्षय कदम,युवासेना माणगाव तालुका चिटणीस प्रणय साळवी, युवासेना सोशल मिडिया समन्वयक,दक्षिण रायगड,प्रभाकर ढेपे शिवसेना लोणेरे विभाप्रमुख,सिकंदर आंबोणकर शिवसेना मांजरवणे विभाग, शिवाजी गावडे गोरेगाव विभागप्रमुख,मोनिश टेंबे युवासेना लोणेरे उप विभाग अधिकारी आणि अनेक पदाधिकारी,युवासैनिक, शिवसैनिक आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog