दहावी,बारावी नंतर काय..?
करिअर व उच्च शिक्षण मार्गदर्शन शिबिरामध्ये सहभागी होण्याचे उद्योजक रोहितदादा पारधे यांचे आवाहन!
साई /माणगांव (हरेश मोरे) कोकणातील विद्यार्थी हे उत्तम प्रकारे शिक्षण क्षेत्रात नेहमी अग्रेसर असतात. परंतु शिक्षण घेतल्या नंतर कोणत्या रोजगार व नोकरी कडे लक्ष द्यायचे या विचारात असतात. यासाठी युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाड विधानसभा समन्वयक रोहितदादा पारधे यांनी करिअर व उच्च शिक्षण मार्गदर्शन शिबीर कुणबी भवन माणगांव येथे रविवार दि.9 एप्रिल रोजी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत आयोजित केले आहे.
इयत्ता दहावी व बारावी नंतरच्या पारंपारिक अभ्यासक्रमाबरोबर अनेक नवीन अभ्यासक्रम सुरु झालेले आहेत. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणाऱ्या विविध प्रकारच्या नवीन अभ्यासक्रमाची माहिती विद्यार्थी आणि पालकांना पुरेशी नसते. त्यामुळे या अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थी पालकांचा गोंधळ होत असतो. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांची क्षमता असूनही त्यांना चांगल्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून करीअर करण्याची संधी मिळू शकत नाही.विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता यावा या उद्देशाने रोहितदादा पारधे यांनी शिबीर आयोजन केले आहे.
या शिबिरासाठी रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, दैनिक लोकसत्तेचे करियर मार्गदर्शक सुहास पाटील, माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेचे रायगड जिल्हा सरचिटणीस प्रभाकर नाईक या तज्ञ व अनुभवी व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी पालक व विद्यार्थी यांच्या असलेल्या शंका त्यांचे निरसन करून समाधानी विचाराने प्रेरित करण्यात येणार आहे.
तरी विद्यार्थी,पालक आणि शिक्षकांनी आपल्या पाल्याचे भविष्य उज्वल करण्यासाठी या करियर मार्गदर्शन शिबिरास उपस्थित राहून संधीचा लाभ घेण्यात यावा.
Comments
Post a Comment