पत्रकार श्याम लोखंडे रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार पुरस्काराने सन्मानित,विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव!
कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण) रोहा तालूका चिल्हे येथील ग्रामीण भागातून पत्रकारिता करणारे श्याम यशवंत लोखंडे यांना रायगड जिल्हा प्रेस क्लब कडून स्व.प्रभाकर पाटील यांच्या नावाने दिला जाणारा रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याने रोहा तालुक्यासह कोलाड खांब देवकान्हे परिसरातून व सर्व स्तरानातून त्यांचे अभिनंदन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
रायगड प्रेस क्लबचा 18 वा वर्धापन दिन पोलादपूर प्रेमक्लब च्या वतीने पोलादपूर येथील बालाजी हॉटेल या ठिकाणी 26 मार्च रोजी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त व रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस. एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकार यांना सन्मानपूर्वक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
प्रसंगी यावेळी रोहा तालुक्यातील पत्रकार श्याम लोखंडे यांना रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी रायगड -रत्नागिरी लोकसभेचे खासदार सुनिल तटकरे, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख,लोकशाही वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक कमलेश सुतार,महाड च्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप,रायगड जिल्ह्य परिषद माजी सदस्य सौ सुषमाताई गोगावले,माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे,माजी अध्यक्षा अपेक्षा कारेकर, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक,अध्यक्ष शरद पाबळे,सचिव अनिल भोळे, कार्यध्यक्ष मिलिंद अष्टीवकर ,प्रेसक्लब अध्यक्ष भारत रांजणकर ,मनोज खांबे, शशिकांत मोरे,सह रायगड प्रेसक्लब पदाधिकारी तसेच सर्व तालूका प्रेमक्लब चे अध्यक्ष आदी सर्व पत्रकार यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.
श्याम लोखंडे यांची पत्रकारितेतील २५ वर्ष समाज सेवा सन १९९६ सालापासून पत्रकारिता करीत आहेत. अनेक वर्ष पत्रकारितेबरोबरच सामाजिक शैक्षणिक संस्कृतिक तसेच विविध क्षेत्रात उत्तम कार्य करत आहेत ग्रामीण भागातील समस्यांवर परखडपणे लेखन करत त्यांनी विविध समस्यांना वाचा फोडत समाज घटकाला न्याय देण्याचे महान कार्य केले आहे.ग्रामीण आणी दुर्गम भागातील आदिवासी बांधवाना शासकीय योजेनेतून लाभ मिळावा यासाठी आदिवासी संघटनेची स्थापना केली या संघटनेचे संस्थापक गावात युवा पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी युवकांना व जेष्ठ नागरिकांसाठी वाचनालय व ग्रंथालय स्थापन केले तसेच कोलाड विभागात नव्याने लायन्सक्लबची स्थापना करून समाजात आरोग्य शैक्षणिक तथा सामाजिक काम त्या माध्यमातून करत आहेत गेली दोन वर्षात या संस्थेच्या माध्यमातून गावोगावी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेत त्यांचे त्यांच्यावर मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया करण्यात आले तर समाजाच्या विविध समस्या आपल्या लेखणीतून सोडविल्या आहेत त्यामुळे त्यांना बंगलोर विदयापीठाची डॉ. पदवी बहाल करण्यात आली आहे. तसेच त्यांना रायगड भुषण, आदिवासी मित्र पुरस्कार, तसेच विविध राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार मिळाला आहे.तर मागील वर्षी ओबीसी संघर्ष समन्वय समिती संलग्न ग्रामीण शाखा रोहा विभाग खांब च्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा लेखणीची योग्य दखल घेऊन रायगड प्रेस क्लब कडून पुरस्कार देण्यात आल्याने त्यांचे विविध स्तरांतून अभिनंद करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .
Comments
Post a Comment