बारा जिल्हा राजस्थान येथे झालेल्या त्रिकोणीय दिव्यांग क्रिकेट टी-20 स्पर्धेत महाराष्ट्र संघाची बाजी
तळा (कृष्णा भोसले)बारा जिल्हा राजस्थान येथे १ व २ मार्च २०२३ रोजी उत्तर प्रदेश राजस्थान व महाराष्ट्र या दिव्यांग क्रिकेट संघाची त्रिकोणी दिव्यांग क्रिकेट टी २० स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते उत्तर प्रदेश संघाने राज्यस्थान संघाला हरवून फायनलमध्ये आपली जागा पक्की केली महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या दोन संघ फायनल मॅचमध्ये महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिकुन प्रथम फलंदाजी करण्यास सुरुवात केली महाराष्ट्र संघाने १२ षटकात ११५ धावा केल्या व ११६ रन्सचे मोठे आव्हान उत्तर प्रदेश दिव्यांग संघासमोर दिले व उत्तर प्रदेश या संघाने १२षटकात ११० रन्सवर रोखले व महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट संघ विजयाचा मानकरी ठरला.
महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट संघाकडून संघाचे कर्णधार व अष्टपैलू खेळाडू कल्पेश तवळे यांनी संपूर्ण सिरीजमध्ये ८ विकेट व हॅट्रिक व्हिकेट व ४० रन्स कमलाकर कोळी ४ व्हिकेट आणि ६० रन्स वैभव सकपाळ ८० रन्स राजू वळवी 50 रन्स गोविंद वसावे ४९ रन्स केल्या आहेत तर भीमसेन मुंढे नागनाथ घोडके रमेश संकपाळ भास्कर राठोड विवेक कदम यांनी ही मैदानात चांगली कामगिरी बजावली मॅन ऑफ द मॅच व मॅन ऑफ द सिरीज व बेस्ट बॉलर म्हणून संघाचे कर्णधार कल्पेश कवळे यांना देण्यात आले .या संघाचे व्यवस्थापन अध्यक्ष ऑल स्पोर्ट्स असोसिएशन फॉर डिसेबल्ड अँड रेहाबिलिटेशन महाराष्ट्र व सचिव सहकार्य अपंग कल्याणकारी संस्थाचे शिवाजी पाटील सहव्यवस्थापक सुनिल पाटील कोच शशांक हिरवे यांनी संघाला राज्यस्थान येथे घेवून गेले व चांगल्याप्रकारे मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment