अश्विनी समेळ यांना सुषमा स्वराज समाज सेविका पुरस्कार प्रदान
माणगाव (प्रतिनिधी)लहानपणापासूनच समाजसेवेची आवड असल्यामुळे विविध सामाजिक संस्था व शासकीय संस्था यांच्या माध्यमातून सौ. आश्र्विनी गणेश समेळ यांनी विविध सामाजिक कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. नेहरू युवा केंद्र भारत सरकार यांच्या माध्यमातून युवक मंडळ तयार करणे, महिला सशक्तीकरण, समाजसेवा, बचत गट तयार करणे. ग्रामीण व शहरी भागातील युवकांना व महिलांना एकत्र करून त्यांना व्यवसाय मार्गदर्शन करणे व शासकीय योजनांची माहिती देणे त्यांच्याकडून सामाजिक उपक्रम करून घेणे अशा विविध सामाजिक विषयांवर उत्तम मार्गदर्शन केले आहे.
राष्ट्रीय एकात्मिक कॅम्प कर्नाटक येथे घेण्यात आला त्यामध्ये महाराष्ट्र गटाचे नेतृत्व अश्विनी गणेश समेळ यांनी केले आहे.
युथ क्लब एक्स्चेंज प्रोग्रॅम साठी गुजरात येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व अश्विनी समेळ यांनी केले आहे.
याचबरोबर ग्रामपंचायत व जिल्हा स्तरावर, महिला व बालकल्याण विभागा मार्फत, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग केंद्र, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या माध्यमातून अश्विनी समेळ नेहमी ग्रामीण भागातील महिला व युवकांना विविध व्यवसाय मार्गदर्शन करतात व युवक - महिलांनी स्वतः आत्मनिर्भर व्हावे यासाठी प्रयत्न करतात.
समाज सेवेमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल माणगाव तालुक्यातील सौ. आश्विनी गणेश समेळ यांना आदरपूर्वक सुषमा स्वराज समाज सेविका पुरस्कार प्रदान करण्यात आला. या बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment