छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने रायगड युवा क्रांती संघटनेच्या वतीने मुंबई येथे भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेमध्ये स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला सदर स्पर्धा कोयना वसाहत गोरेगाव ईस्ट मुंबई या ठिकाणी संपन्न झाल्या या घेण्यात आलेल्या भव्य रांगोळी स्पर्धेमध्ये स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
या रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. साक्षी ढेबे,द्वितीय क्रमांक कु. साक्षी कदम,तृतीय क्रमांक कु. ज्योती शिर्के, तृतीय क्रमांक कु. पल्लवी दळवी,
तृतीय क्रमांक कु.आयशा महाडिक यांनी पटकाविला.
या कार्यक्रमाला संघटनेचे सर्व सभासद पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम कोयना वसाहत गोरेगाव ईस्ट मुंबई या ठिकाणी संपन्न झाला.
रायगड युवा क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य ही अल्पावधीतच नावारूपाला आलेली संघटना असून ती नेहमी शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक तसेच समाजभिमुख कार्यक्रमांमध्ये नेहमी पुढाकार असतो अल्पावधीतच ही संघटना ग्रामीण भागात घराघरांमध्ये पोहोचली असून जनतेला नेहमीच मदतीचा हात देण्यासाठी नेहमीच पुढाकार असतो. रायगड युवा क्रांती संघटनामहाराष्ट्र राज्य या संघटनेच्या समाजभिमुख कार्यक्रमाचे समाजात कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment