केंद्र पुरस्कृत किसान सन्मान निधी वाटप कार्यक्रम
पाहण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद!
तळा (कृष्णा भोसले) तळा तालुक्यातील सोनसडे तलाठी सजा मार्फत सोनसडे ग्रा. पं. कार्यालयात सोनसडे सजाचे तलाठी किशोर
मालुसरे यांनी केन्द्र पुरस्कृत किसान सन्मान निधी वाटप कार्यक्रम दाखविला हे पहाण्यासाठी लाभार्थी शेतकरी बंधु भगिनी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी किसान सन्मान निधीचे वाटप 13वा हप्ता 27 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजता कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे वितरणाचा शुभारंभ केला. याकार्यक्रमाचे प्रसारण थेट दुरदृश्य प्रणालीव्दारे दाखविण्यात आला.
हा कार्यक्रमशेतकरी बांधवांपर्यंत पोहचविण्याचे शासनाचे आदेश होते. तळा तहसीलदार ए. एम. कनशेट्टी यांचे मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मडंळअधिकारी नेहा ताबंडे, कृषी सहाय्यक योगेश कोळी, दत्तात्रय दुधाटे, सरपंच माधुरी पारावे,सदस्य परशुराम वरंडे, सोनसडे गावातील पदाधिकारी, लाभार्थी शेतकरी बांधव भगिनी या कार्यक्रमात उपस्थित होते.
Comments
Post a Comment