मालक होण्यापेक्षा विष्णुचे दास झालेत तर आपले जिवन सुखी होईल :- ह.भ.प.विठ्ठल महाराज चवरे
कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण)जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणूस मालक होण्यासाठी जगत असतो.मालक होण्यासाठी शिक्षण,कामधंदा,नोकरी,करीत असतो तरीही सुखी होत नाही परंतु तुम्ही विष्णुचे दास झालेत तर आपले जिवन सुखी होईल असे नागोठणे येथील किर्तन सेवेत ह.भ.प.विठ्ठल महाराज चवरे यांनी व्यक्त केले.
कायावाचामने झाला विष्णु दास l काम क्रोध त्यास बाधिती ना ll विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता l सकल भोगीता होय त्याचे ll तुका म्हणे चित्त करावे निर्मळ l येऊनि गोपाळ राहे ll या जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या आधारे स्पष्ट करतांना ह.भ.प. विठ्ठल महाराज चवरे यांनी सांगितले कि माणूस कितीही विद्वान असला तरी त्याच्या जवळ काम,क्रोध,मोह,लोभ,मद,मत्सर यापैकी कोणतेही विकार असतील त्याला देव दिसणार नाही.पराशय ऋषीचे आश्रमातील काम संपल्यानंतर ते गावात गेले गावातील काम संपल्यावर ते आश्रमात निघाले मधी नदी आडवी होती दुपारची वेळ होती सर्व नावाडी जेवायला गेले. तेथे एक नावाड्याची मुलगी आली तीने महाराजांना नमस्कार केला व ती मुलगी म्हणाली तुम्हाला काय पाहिजे? तेव्हा महाराज म्हणाले मला पलीकडे जायचे आहे. तर ती मुलगी म्हणाली मी नावाड्याची मुलगी आहे मी तुम्हांला सुखरूप पलीकडे सोडते तेव्हा ७० वर्षांचे म्हातारे नावेत बसले व १६ वर्षाची मुलगी नाव चालवू लागली.नाव निम्यावर गेली व वासनेचा स्फोट झाला म्हाताऱ्याने त्या मुलीला विचारले तु माझी इच्छा पुर्ण करशील काय त्यावर मुलीने उत्तर दिले कि तुम्ही माझ्या बापासारखे आहात तेव्हा म्हाताऱ्याने ध्यान करून २५ वर्षांचे रुप धारण केले व म्हणाला आतातरी माझी इच्छा पुर्ण करशील काय? त्यावर मुलीने उत्तर दिले कि आता तर दुपारचे १२ वाजले आहेत. त्यावर म्हाताऱ्याने रात्रीचे बारा वाजले अशी परिस्थिती निर्माण केली व आतातरी माझी इच्छा पुर्ण करशील काय? त्यावर मुलीने उत्तर दिले आपण गंगेत आहोत गंगा ही मातेसमान आहे. म्हाताऱ्यांनी तेव्हा ती नावे नदीतून हवेत उडवली परंतु असे असले तरी त्या म्हाताऱ्यला पलीकडे नाव नेता आली नाही कारण त्याच्याकडे कामाची भावना निर्माण झाली.
यावेळी ह.भ.प. नारायण दादा वाजे अलिबाकर महाराज,ह.भ.प भरत महाराज वाजे, गायनाचार्य राम दळवी, वैभव खांडेकर,नागोठणे परिसरातील असंख्य भाविक,उपस्थित होते सुवर्ण मोहोत्सव नामयज्ञ सोहळा आयोजन करण्यासाठी ग्रामस्थ मंडळ,महिला मंडळ, तरुण वर्ग, संतसेवा मंडळ, ज्ञानेश्वर मंदिर नागोठणे यांचे सर्व कार्यकारणी मंडळ व सर्व सदस्य यांनी मेहनत घेतली.
Comments
Post a Comment