शिव ऊर्जा मित्र मंडळ अंधारआळी रोहा गडसंवर्धन मोहीम यशस्वीरित्या पार!

 रायगड (भिवा पवार /राजेश हजारे) इतिहास नुसताच पुस्तकातून नव्हे, तर प्रत्यक्षात सुद्धा आपल्या मुलांनी बघितला पाहिजे. हे गड चढले पाहिजेत, तिथे फिरले पाहिजे, त्याच्या आजूबाजूचे वातावरण अनुभवले पाहिजे आणि स्थापत्त्यकलेचा नमुना अभ्यासला पाहिजे. गडाचे संवर्धन जतन केले पाहिजे कारण आजचा महाराष्ट्र हा याच इतिहासाच्या कर्तबगारीवर उभा आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेतून बोध घेऊनच आपण आपले भविष्य घडवू शकतो. आणि आपली पुढची पिढी कालचा हा उज्ज्वल इतिहास जाणूनच उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवू शकते. आणि म्हणूनच गडांचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे याच उद्देशाने प्रेरित झालेल्या रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील शिव ऊर्जा मित्र मंडळ अंधारळी रोहा यांच्या विद्यमाने महाशिवरात्रीचे औचित्य साधून १८ फेब्रुवारी रोजी  शिवपूजनाने मित्र मंडळ यांनी घोसाळगडावर पहिली गड संवर्धन मोहीम नियोजनपूर्वक यशस्वीपणे पार पडली.

हिमालयाचा रुद्र उतरला सह्याद्रीच्या कड्यावर,चारही धाम अवतरले एकल्या विरगडावर...

शांत भग्न पण उग्र असा दगडात झंझावात शतकांचा,तख्त राखिले, इतिहास घडविला अभिषेक घालून रुधिराचा...

“ जगाचा ईश्वर तो एकच शंभुमहादेव,

‘शेवटी मराठी अस्मिता ही येथूनच सुरु होते...,

इथूनच मिळते बळ जगण्याचे उमेद कर्तुत्वाची आणि ताकद निश्चयाची...''

महाशिवरात्रीचे औचित्य साधत शिव पुजनाने दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवऊर्जा मित्र मंडळाची पहीली गडसंवर्धन मोहीम ही घोसाळगडावर नियोजनबद्ध यशस्वी रित्या पार पडली. मोहिमेत प्रत्यक्ष रित्या ३५ शिवप्रेमींनी सहभागी होवुन श्रमदान केले.तसेच संपूर्ण गडाची स्वच्छता केली. या गड संवर्धन महिमेत अप्रत्यक्ष रित्या आर्थिक मदत व जेष्ठ शिवप्रेमींचे आशिर्वाद या कार्यास लाभले.सदर गड संवर्धन मोहिमेत शिव ऊर्जा मित्र मंडळ अंधार आळी मित्रमंडळाचे अध्यक्ष समीर दळवी, सचिव अरुण साळुंखे, तसेच ३५शिवप्रेमींनी सहभागी होवुन श्रमदान केले.

Comments

Popular posts from this blog