गोवे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रंजिता जाधव यांची बिनविरोध निवड
कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण) रोहा तालुक्यातील गोवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच भावना भरत कापसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी शुक्रवार दि.१०/२/२०२३ रोजी रंजिता राजेंद्र जाधव यांनी अर्ज दाखल केला.उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे गोवे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रंजिता राजेंद्र जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विकासाचे महामेरू खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नातून,आ.आदितीताई तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष सरपंच महेंद्र पोटफोडे यांच्या माध्यमातून गोवे ग्रामपंचायतीतील गोवे, मुठवली,शिरवली या तीन ही गावातील अंतर्गत रस्ते,नळ पाणीपुरवठा योजना,समाजमंदिर,स्मशानभूमी,व इतर विविध कामे करण्यात आली. या विकासाच्या जोरावर गोवे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली.यावेळी ही उपसरपंच पदी रंजिता जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खांब-कोलाड जिल्हा परिषद मतदान संघाचे विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव, विभागीय अध्यक्षा तथा ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया जाधव,गोवे ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र पोटफोडे,माजी उपसरपंच भावना कापसे, ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव, नरेंद्र पवार,निशा जवके,अंजली पिंपळकर,सुमित गायकवाड युवा कार्यकर्ते संदीप जाधव,लहू पिंपकर,राजेंद्र जाधव,भरत कापसे,उत्तम बाईत,किशोर बाईत, सुनिल म्हसकर, प्रशांत म्हशीळकर,मनोज शिगवण, अजय बाकडे,शरद कचरे,शेखर घोणे, सुमित महाबळे,मनोज जाधव,राकेश कापसे,सुभाष चितळकर, सतिश गोरिवले,योगेश गोरीवले,जेष्ठनेते तानाजी मोरे,केशव साळवी,गावकमेटी अध्यक्ष नामदेव जाधव,सचिव श्रीधर गुजर,खजिनदार कमलाकर शिर्के,मनोहर मांजरे,भरत जाधव, महेंद्र जाधव,विजय जाधव,शेखर जाधव,गणपत गुजर,सुदाम जाधव,गणेश जाधव,यशवंत जाधव सहेंद्र पवार,रमेश गायकवाड,शांताराम गायकवाड,ग्रामसेवक गोविंद शिद, संगणक परिचालक अश्विनी पोटफोडे, कर्मचारी मयुरी जाधव, शिपाई अजय पिंपळकर,शनिता मांजरे, व असंख्य गोवे ग्रामस्त, तरुण वर्ग व महिला वर्ग उपस्थित होत्या.सर्व उपस्थितांनी नवनिर्वाचित उपसरपंच यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment