रोहा तालुक्यातील पुगाव येथील वाचनालयास मुक्त पत्रकार राजेश हजारे यांनी दिली पुस्तकांची भेट
खांब (नंदकुमार कळमकर)आताच्या आधुनिक विज्ञानाच्या काळात वाचन संस्कृती मागे पडत असताना ही वाचन संस्कृती पुन्हा रुजावी व ती खेडोपाड्यात शेवटच्या माणसापर्यंत पोचावी कुणी निरक्षर राहू नये. खेडोपाड्यात,दुर्गम भागात राहणा-या अभ्यास करू ईच्छीणा-या होतकरू तरूणांना प्रोत्साहन व सर्वतोपरी पुस्तकांच्या माध्यमातून मदत व्हावी त्याचे व्यक्तिमत्त्व विकसित व्हावे तसेच दुर्गम भागातील गरीब वंचिताचे जिवन,राहणीमान स्वयंपूर्ण व्हावे या उदात्त हेतूने कार्यरत असलेले शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर यांनी स्वर्गीय हरिभाऊ लक्ष्मण म्हसकर ग्रंथालयाची स्थापना रोहा तालुक्यातील येथे पुगाव येथे 3 जुलै 2022रोजी स्थापना करण्यात आली.
या वाचनालयात कृषी, काव्य,इतिहास,अध्यात्मिक विभाग आदी विभाग कार्यरत आहेत तसेच स्पर्धा परीक्षा, रेल्वे रीक्रूटमेट,युपीएसी, एमपीएससी परीक्षेस लागणारी सर्व पुस्तके येथे उपलब्ध आहेत त्यामुळे खांब,कोलाड येथील वाचक प्रेमींना त्याचा फायदा होताना दिसत आहेत.
सदरील वाचन संस्कृतीची चळवळ चालवणा-या शंकरराव म्हसकर यांच्या या कार्याने प्रेरीत होऊन जेष्ठ मुक्त पत्रकार राजेश हजारे यांनी आपल्याकडील काही पुस्तके या वाचनालयास भेट दिली. यावेळी मुक्त पत्रकार राजेश हजारे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे रोहा तालुका उपसचिव सुधीर क्षीरसागरउपस्थित होते. त्याबद्दल पुगाव वाचनालयाचे संस्थापक शंकरराव म्हसकर यांनी आभार व्यक्त केले.
पुगाव येथील वाचनालयाचे संस्थापक शंकरराव मस्कर यांना पुस्तक संच भेट देताना मुक्त पत्रकार राजेश हजारे सोबत कोकण मराठी साहित्य परिषदेचे रोहा तालुका उपसचिव सुधीर क्षीरसागर छायाचित्रात दिसत आहेत.
Comments
Post a Comment