वीरशैव लिंगायत समाजाचा डोंबिवली येथे वधू वर पालक परिचय मेळावा
रोहे (महादेव सरसंबे)महाराष्ट्र वीरशैव सभा ठाणे जिल्हा समिती व वीरसैव लिंगायत सेवा संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली येथे ११ डिसेंबर रोजी ३३ वा वधु वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आले असल्याचे महाराष्ट्र वीरशैव सभा प्रांतिक सदस्य बसवंतराव अळ्ळगी यांनी सांगितले आहे.
वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व पोटजातील इच्छुक वधू-वरांचा व पालक मेळावा डोंबिवली येथील धर्मवीर आनंद दिघे सभागृह गांधीनगर डोंबिवली पूर्व येथे सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आले आहे. या वधू वर मेळावा दरम्यान विविध समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात महात्मा बसवेश्वर समाज रत्न पुरस्कार श्री चिदानंद बसवंतराव पाटील,संत शिरोमणी अक्कमहादेवी पुरस्कार श्रीमती प्रमिला विठ्ठल लंबे यांना देण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अंबरनाथचे नगराध्यक्ष अरविंद वाळेकर, अनंत हलवाई संचालक प्रफुल्ल शेठ गवळी,अध्यक्ष शांतकुमार लच्याने, कार्याध्यक्ष प्रदीप निलाखे, सरचिटणीस सिद्धेश्वर लिगाडे, सल्लागार चंद्रकांत मनियाळ,प्रांतिक सदस्य रामलिंग मेनकुदळे चिटणीस सिद्राम बलुरे, खजिनदार श्रीकांत किरनाळे, प्रांतिक सदस्य बी.डी. अळ्ळगी, उपाध्यक्ष शिवानंद संकपाळ, उपाध्यक्ष प्रमिला लंबे आधी उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र वीर सेवा सभा ठाणे जिल्हा समिती, वीरशैव लिंगात सेवा संस्था ठाणे कार्यकारणी सदस्य, समाजबांधव परिश्रम घेत आहेत
Comments
Post a Comment