प्रा.माधव आग्री यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्काराने सन्मानित
कोलाड (विश्वास निकम ) रायगड रोहा तालुक्यातील तांबडी गावाचे सुपुत्र प्रा. माधव आग्री यांना प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच कोल्हापूर यांच्या वतीने सोमवार दि.२८ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
प्रा. माधव आग्री हे कोलाड रोहा लायन्स क्लबचे उपाध्यक्ष असून ते मुंबई कुणबी समाज संघ, रायगड जिल्हा कुणबी समाज, रोहा तालुका कुणबी समाज शहर अध्यक्ष,ओबीसी समाज या संघटनेत सामाजिक समाज हिताचे काम करीत आहेत.या सामाजिक कार्याची दख्खल घेत राष्ट्रपिता महात्मा जोतिबाफुले यांच्या स्मुतीदिनाचे औचित्य साधून राजेर्षी शाहू स्मारक भवन,मुख्यसभागृह कोल्हापूर येथे प्रा. माधव आग्री यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते बहाल करत सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी डॉ.श्रीपाल सबनीस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन माजी अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष,प्रा.डॉ.राजेखान शानेदिवाण जेष्ठ साहित्यिक व विचावंत,खासदार धैर्यशीलदादा माने,खासदार निवेदिता माने,डॉ.सुरेशराव जाधव,विजय कांबळे,डॉ.अरुण भोसले, डॉ. राजेंद्र दास,प्रा.डॉ.प्रशांतकुमार कांबळे,महादेव निर्मिले, सुरज वाघमारे,यांच्या शुभहस्ते प्रा.माधव आग्री यांना हा पुरस्कार देण्यात आला.या पुरस्काबद्दल कोलाड रोहा लायन्स क्लब,मुंबई कुणबी ग्रुप,रायगड जिल्हा कुणबी ग्रुप, रोहा तालुका कुणबी ग्रुप व संपूर्ण ओबीसी समाजाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी प्रा.माधव आग्री यांच्या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment