माणगाव येथे युवा युवतीनां मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण संपन्न
माणगाव (प्रतिनिधी)माणगाव तालुक्यातील युवक युवतींना जिल्हा उद्योग केंद्र आणि क्षितिज मल्टीपर्पज असोसिएशन च्या समन्वयाने मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणासाठी जिल्हा उद्योग केंद्र अलिबाग चे मा. श्याम बिराजदार, मा. प्रदीप सावंत, मा. प्रथमेश सुतार यांनी प्रशिक्षणार्थीची मुलाखत घेऊन निवड केली तसेच क्षितिज मल्टीपर्पज असोसिएशनच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणा दरम्यान जिल्हा उद्योग केंद्राचे मा. मोहन पालकर यांनी प्रशिक्षणार्थीला जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांची माहिती दिली व प्रशिक्षणानंतर व्यवसायासाठी महिलांना 35% सबसिडी व पुरुषांना 25% सबसिडी भेटू शकते यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती दिली.
यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना माणगाव पंचायत समिती चे गटविकास अधिकारी माननीय प्रभे साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले याप्रसंगी क्षितिज मल्टीपर्पज असोसिएशनच्या माणगाव तालुका व्यवस्थापक सौ. अश्विनी गणेश समेळ, मा. गायकवाड साहेब, मा. काप साहेब उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक आणि अभिनंदन करून सर्वांगीण विकासासाठी आजच्या तरुण वर्गाने व्यवसाय निर्मितीत पुढे यावे असे आव्हान केले. या प्रशिक्षणासाठी क्षितिज मल्टीपर्पज असोसिएशनच्या संस्थापिका सौ. शितल माळी यांचे मोलाचे मार्गदर्शन भेटले.
Comments
Post a Comment