पुगांव येथे श्री योगीराज दत्त जन्मोत्सव व अखंड हरीनाम सोहळा
खांब -पुगांव (नंदकुमार कळमकर)श्री सद्गुरू पद्मनाभाचार्यस्वामी यांचे शिष्य संप्रदाय अमृतनाथस्वामी यांच्या कृपाछत्राखाली गुरुवर्य त्रिनयनस्वामी,सदाशिवस्वामी,अंबरधर स्वामी,शिवानंदस्वामी,नरेंद्रस्वामी, नरेंद्रनाथस्वामी यांच्या आशिर्वात्मक प्रेरणेने सांप्रदाय भारती गु, जनार्दनस्वामी (वाडीकर महाराज )सदानंद स्वामी, गोपाळ चव्हाण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तमोहोत्सव व अखंड हरिनाम सोहळा मार्गशिर्ष शुद्ध १३सोमवार दि.५/१२/२०२२ ते गुरुवार दि.८/१२/२०२२ पर्यंत साजरा होणार आहे.
या निमित्ताने पहाटे प्राप्तस्मरण सुदर्शन स्तोत्र व काकड आरती,सकाळी ७ ते ८ वा.घटस्थापना श्री व सौ.सुषमाताई सुभाष देशमुख,सकाळी ८ वा. ध्वजरोहन,सकाळी ९ वा.विणापूजन,सकाळी ९.३० वा.पंचरत्न गिता ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण, सा.५ ते ६ वा.प्रवचन,सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ,७ ते ९ हरिकीर्तन व रात्री ११ नंतर हरिभजन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.सर्व कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी सर्व कार्यकारिणी मंडळ व पुगांव ग्रामस्थ मेहनत घेत आहेत.
Comments
Post a Comment