ओबीसी जनमोर्चाच्यावतीने जातीनिहाय जनगणनासाठी १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा

न्यायी हक्कासाठी,भावी पिढीच्या उत्कर्षासाठी हजारो समाजबांधवाना मोर्चात सामिल होण्याचे सुरेश मगर यांचे आवाहन

रोहा (श्याम लोखंडे)ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना होत नाही तो पर्यंत ओबीसींची संख्या कळणार नाही.त्यामुळे ओबीसीचे अपेक्षीत हक्क मिळणार नाही.यासाठी आपल्या न्यायाच्या हक्कासाठी जातीनिहाय जनगणना ची मागणी घेत ओबीसी संघर्ष समन्वय समिती तथा ओबीसी जनमोर्चा च्या वतीने शुक्रवारी १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जातीनिहाय जनगणना सह अन्य मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधवांचा मोर्चा धडकणार असल्याने रोहा तालुक्यातील सर्व ओबीसी नेतेगण व कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन रायगड जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समिती संलग्न ओबीसी जनमोर्चा चे अध्यक्ष सुरेश मगर यांनी केले आहे.

येत्या १८ नोव्हेंबर रोजी ओबीसींच्या न्याय हक्कासाठी जिल्ह्याधिकारी अलिबाग येथे जनमोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर रोहा तालुका संघर्ष समन्वय समिती संलग्न ओबीसी जनमोर्चा संघटनेची तालुका कार्यकरणी आढावा बैठक शासकीय विश्रामगृह रोहा येथे मोठया उत्साहात झाली यावेळी त्यांनी सर्व उपस्थित समाजघटकांना जनमोर्चात मोठया संख्येने सहभागी होण्यासाठी आवाहन केले आले.

रायगड जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समिती संलग्न ओबीसी जनमोर्चा रोहा तालुका या संघटनेची सभा गुरुवारी ४ नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह रोहा येथे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश मगर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सर्व ओबीसी बांधव यांच्या समावेत आपल्या ओबीसींच्या न्यायहक्कांसाठी हा लढा उभारला आहे आणि तो यशस्वीपणे पार करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय घेऊन आपण रायगड जिल्हा अधिकारी अलिबाग येथे मोर्चा नेऊन या सरकारला जाग येण्यासाठी दाद मागणार असल्याचे सांगितले आहे.यासाठी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, महाड, श्रीवर्धन, म्हसळा,तळा, मुरुड, माणगाव,सुधागड, खालापूर, कर्जत, पनवेल,उरण,अलिबाग,पेण,रोहा,सह विविध तालुक्यातील सर्व ओबीसी समाज घटक एकत्रित करून हा कार्यध्यक्ष चंद्रकांत बावकर,प्रकाश आण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाचा महा जनमोर्चा निघणार असून आपल्या न्यायीहक्काची अमलबजावणी या सरकारने करावी अशी मागणी करण्यात येणार आहे.

यावेळी रोहा तालुका ओबीसी अध्यक्ष अनंत थिटे, जिल्हा कार्यकारणी सदस्य ऍड मनोजकुमार शिंदे,शिवराम शिंदे,शिवराम महाबळे, परीट समाज कोकण अध्यक्ष नंदकिशोर राक्षे, ओबीसी जनमोर्चा ता.सरचिटणीस महादेव सरसंबे,खजिनदार दत्ताराम झोलगे, उपाध्यक्ष रामचंद्र म्हात्रे,अमोल पेणकर,आगरी समाज अध्यक्ष हरिश्चंद्र मोरे,युवक अध्यक्ष लक्ष्मण मोरे, माजी नगरसेवक महेश कोलाटकर, महेंद्र दिवेकर,काशीनाथ धाटावकर,शाहीर वसंत भोईर, विकास भोईर,रविंद्र घरत,मंगेश यावर,धाटाव अध्यक्ष अमित मोहिते,खांब अध्यक्ष डॉ श्यामभाऊ लोखंडे,भातसई सरचिटणीस गणेश खरीवले,रामाशेठ म्हात्रे, नवनीत डोलकर,लक्षमण जंगम,मुकेश भोकटे,महेंद्र मोरे,महेश तुपकर,सुहास खरीवले,अनंत चौलकर, ज्ञानेश्वर सांळुखे,अनिल बामुगडे,राकेश पवार, सुर्यकांत कोलाटकर,दगडू बामुगडे,यशवंत हळदे, सुर्यकांत वाघमारे,अरुणेश चोरगे,आदी मान्यवर उपस्थित होते.

आयोजित करण्यात येत असलेल्या जनमोर्चा यासाठी अधिकाधिक ओबीसी समाज बांधवांनी एकत्रितपणे येऊन लढा दिले पाहिजे या आवाहनाला तालुक्यातील गठित करण्यात आलेल्या ओबीसी संघटनेचे विभागीय अध्यक्ष व विविध समाजाचे नेतेमंडळी यांनी प्रतिसाद देत आपला पाठींबा दर्शवित यासाठी लागणारे वाहतूक यंत्रणा ही त्या त्या पातळीवर करण्यासाठी सज्ज असल्याची ग्वाही सर्वानुमते दिली ओबीसींच्या न्यायहक्कांसाठी निघणारा हा जनमोर्चा भूतो ना भविष्य असा ठरला पाहिजे अशी भावना यावेळी उपस्थितांनी केली.

कुणबी,आगरी, कोळी,तेली,सुतार,नाभिक, कुंभार, जंगम,माली,परीट, धनगर,गोसावी,सह सर्व उपस्थित ओबीसी समाजांनी सदरच्या मोर्चाला पाठींबा दर्शवित सहभागी होण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे तर उपस्थित धाटाव विभाग युवा कार्यकर्ते मुकेश भोकटे यांनी यासाठी रोख रक्कम पन्नास देणगी स्वरूपात जाहीर केली आहे त्याच बरोबर अधिक काही समाज बांधवांनी ही मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे .

शेवटी राज्यासह देशभरात ओबीसीचे संख्याबल अधिक आहे त्यामुळे ओबीसीला त्यानुसारच आरक्षण दिले गेले पाहिजे सन 1931 नंतर संपूर्ण देशात ओबीसींची जनगणना सरकारने केली नाही त्यामुळे काहीसा हा ओबीसी समाज व त्याला शासनाच्या मिळणाऱ्या सोयी सुविधा या पासून वचिंत राहिला आहे गेली अनेक वर्षे देशातील राजकीयदृष्ट्या पाहिले तर देशात बहुसंख्येने असलेला ओबीसी समाज हा मागासलेला आहे आर्थिक बळ नाही निवडणुकीत त्याला पुरेसा आरक्षण नसल्याने त्याची पिछेहाट होत आहे. त्यामुळे येत्या कालावधीत रायगड जिल्ह्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांना एकत्रित करून ओबीसी समाजाच्या संघाटनात्मक वाढीवर भर देत त्यांना बळ देऊन समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात लढा उभारला जाणार असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समिती व ओबीसी जनमोर्चा चे अध्यक्ष सुरेश मगर यांनी रोहा येथील आयोजित केलेल्या तालुका कार्यकरणी सभेत केले यासाठी या मोर्च्यात लाखोंच्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन केले.

यावेळी मनोजकुमार शिंदे यांनी ओबीसी समाज बांधवांनी एकत्रीत येत भव्य स्वरुपात मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करीत बैठकीस उपस्थित असलेल्यांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महादेव सरसंबे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog